धुळे हत्याकांड खटला 'फास्ट ट्रॅक कोर्ट'कडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर - धुळ्यातील घटना अत्यंत अमानुष असून, या घटनेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी हा हरकतीच्या मुद्दा उपस्थित केला होता. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भटक्‍या समाजासाठी एक योजना आखली जाईल, असे सांगितले.

Web Title: dhule hatyakand crime fast track court devendra fadnavis