Dhule News : बालपिढीला संगणक, मोबाईल ‘गेम्स’चा लळा; मैदानी खेळांकडे पाठ फिरविल्याने आरोग्यावर परिणाम

Dhule : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम विविध घटकांवर होत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम असूनही अनेकांच्या ते लक्षातही येत नाही.
interest of computer, mobile "games" to children.
interest of computer, mobile "games" to childrenesakal

Dhule News : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम विविध घटकांवर होत आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम असूनही अनेकांच्या ते लक्षातही येत नाही. समजा आले तर त्यांच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. यातूनच सध्या बालपिढीही अनेक पारंपरिक मैदानी खेळ, विविध खेळण्यांऐवजी संगणक, मोबाईलवरील गेम खेळण्यात दंग असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पारंपरिक खेळ नामशेष होण्याची शक्यता असून, अशा खेळांना पाठबळ देणे आवश्यक आहे. आधुनिक, पारंपरिक खेळांकडे मुलांनी पाठ फिरविली आहे. ( Health consequences of turning away from outdoor sports in children )

मोबाईल चिमुकल्यांचे खास आकर्षण

सध्या चिमुकल्यांना मोबाईल आणि कॉम्प्युटरचे विशेष आकर्षण आहे. अगदी चार-सहा वर्षांची बालकेही मोबाईल सहजपणे हाताळतात. त्यातील गेमही खेळतात. अनेक जण खेळण्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. यामुळे ते मैदानी खेळापासून वंचित राहतात. अशा बालकांच्या शारीरिक, मानसिक विकासावर परिणाम होत आहे.

कॉम्प्युटर, मोबाईलवरील गेममध्ये ही मुले गुंतल्याने बाजारात उपलब्ध पारंपरिक, आधुनिक खेळण्यांकडे मुलांनी पाठ फिरविलेली दिसते. काही पालक मात्र घरातच बौद्धिक खेळणी आणण्यास‌ प्राधान्य देतात. अशा खेळण्यांमधून अभ्यासही होत असल्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एबीसीडी, अंकगणित या खेळण्यांना पालकांकडून जास्त मागणी असते.

मेकॅनिक गेमशी खेळताना त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारची रचना करून रोबोट, दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्यात येतात. एकटी व्यक्तीही हा खेळ सहज खेळू शकते. एक प्रकारचा बौद्धिक खेळ असल्याने मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळू शकते. (latest marathi news)

interest of computer, mobile "games" to children.
Dhule News : पावसाळ्यापूर्वी कचरा डेपोवर उपाययोजना; जेसीबी, पोकलेनद्वारे कचऱ्याचे ढीग

खेळणी विक्रेते केवळ बाजार, यात्रेत

इंटरनेटच्या अन् मोबाईलच्या जमान्यात मुलांना सहज गेम्स उपलब्ध होत असल्यामुळे खेळण्यांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. अलीकडे केवळ आठवडेबाजार आणि यात्रा-जत्रा उत्सवात खेळणी विक्रेते दुकाने लावत असल्याचे चित्र आहे. मोबाईलच्या माध्यमातून किक्रेट अन् शर्यतीचे गेम्स कोठेही कधीही खेळता येत असल्यामुळे ते जास्त लोकप्रिय झाले आहेत. काही विक्रेत्यांनी आधुनिकतेची कास धरत अशी खेळणीही आपल्या दुकानातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

चिमुकलेच काय, आबालवृद्धानांही वेड

मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आल्याचा दावा केला जात आहे आणि ते वास्तवही. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणामही आजच दिसत असल्याचे नाकारता येणार नाही. मोबाईलचे वेड, लळा चिमुकलेच काय महिला, आबालवृद्धानांही लागला आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसामाणसातील संवाद कमी होत चालला आहे. सामाजिक भान हरपत चालल्याचे चित्र आहे.

मोबाईलवर तासन तास बोलणारेही कमी नाहीत. किती वेळ बोलावे याचेही भान राहत नसल्याचे वास्तव आहे. महाविद्यालयीन युवतींसारखा मोबाईल आपल्याजवळ हमखास असावा असा आग्रह महिलांचा असतो. यातून त्याचा चांगला उपयोग होणे अपेक्षित असताना त्याचा अतिरेक होताना दिसतो. मोबाईलवर स्टेटस ठेवल्यापासून सेल्फीचा मोहही आवरला जात नसल्याचे सर्वश्रुत आहे.

''जलदगतीचे संपर्काचे साधन म्हणून मोबाईल असला तरी अतिरेक वापर टाळला पाहिजे. बालमनावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. घरातील प्रत्येक आई-वडिलांनी आपली लहान मुले मोबाईलपासून लांब राहतील तो कटाक्ष पाळावा. अतिरिक्त वापरामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. मोबाईल म्हणजे खेळणे नव्हे.''-रामराव ह्याळीस, ज्येष्ठ नागरिक, म्हसदी

interest of computer, mobile "games" to children.
Dhule News : जिल्हा बँकेतर्फे 263 कोटींचे खरीप पीककर्ज! धुळे- नंदुरबारच्या 22 हजारांवर सभासद शेतकऱ्यांना लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com