CM Devendra Fadnavis
sakal
धुळे: जिल्ह्यात सप्टेंबरअखेर वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. यात १२ ते १५ हजार हेक्टरवरील कांदा, कापूस, पपई, केळी, ऊस आदी पिकांना फटका बसला. त्यामुळे अतिवृष्टी आणि वादळी पावसाने बाधित जिल्ह्यात धुळ्याचा समावेश करावा, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार रावल, माजी आमदार कुणाल पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावर अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यात धुळ्याचा समावेश होईल, असा सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला होता. लगोलग जिल्ह्याच्या समावेशाचा ‘जीआर’ सायंकाळी पारितही झाला.