HIV
sakal
धुळे: जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या तपासणीत तब्बल ९५५ जणांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाधित रुग्णांमध्ये ४२ गरोदर मातांचा समावेश असल्याने प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. ‘एचआयव्ही’ बाधितांची वाढती संख्या या आकडेवारीने अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे.