धुळे: कुसुंबा (ता. धुळे) येथील शेताच्या शेडमध्ये विनापरवाना खतसाठा आढळला. विक्रीसाठी ठेवलेल्या या खत व जैव उत्तेजकांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत सुमारे ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.