Mohadi Police Bust Illegal Foreign Liquor Transport : मोहाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत ट्रकसह एक कोटी दोन लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई झाली.
धुळे: विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या मद्यतस्करांविरुद्ध मोहाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत ट्रकसह एक कोटी दोन लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकास अटक केली. रविवारी (ता. १८) सायंकाळी ही कारवाई झाली.