Dhule News : ‘आयुष्मान कार्ड' वितरणात धुळे राज्यात नववे; 6 लाख ९२ हजार कार्ड वाटप

जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्डचे १५ लाख ३८ हजार ४०१ लाभार्थी असून त्यापैकी सहा लाख ९२ हजार ६८२ कार्डाचे वितरण झाले.
Ayushman Bharat Mission Maharashtra Committee Chief Dr. Omprakash Shete.
Ayushman Bharat Mission Maharashtra Committee Chief Dr. Omprakash Shete.esakal

Dhule News : जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्डचे १५ लाख ३८ हजार ४०१ लाभार्थी असून त्यापैकी सहा लाख ९२ हजार ६८२ कार्डाचे वितरण झाले आहे. हे कार्ड वितरणात धुळे जिल्हा राज्यात नवव्या क्रमांकावर आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

दरम्यान, उर्वरित नागरिकांना आयुष्मान कार्ड वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय, खासगी दवाखान्यात, सार्वजनिक वितरण प्रणाली तसेच महत्त्वाच्या धार्मिकस्थळी तसेच सहकारी संस्थेच्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. (Dhule is ninth in state distribution of Ayushman Card 6 lakh 92 thousand cards distributed news)

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा व सेवा संदर्भात आढावा बैठक झाली.

बैठकीस जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, आशासेविकांचे प्रतिनिधी, सीएससी सेंटरचे प्रतिनिधी यांच्यासह या योजनांच्या पॅनलवरील रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ayushman Bharat Mission Maharashtra Committee Chief Dr. Omprakash Shete.
Dhule News : मालमत्ता करप्रश्‍नी धुळेकरांना दिलासा : आमदार फारूक शाह

डॉ. शेटे म्हणाले की, धुळे जिल्ह्यात उर्वरित लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यासाठी नियोजन करावे, यासाठी सर्व डाटा एन्ट्रीधारकांना सूचना द्याव्यात. रेशन दुकानदारांना कार्ड काढण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावेत. कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्या वाढवावी.

आयुष्यमान भारत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या सेवा देणाऱ्या नवीन रुग्णालयांची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. आरोग्य मित्रांची संख्या वाढविण्यात यावी.

अशा रुग्णालयांचा प्रस्ताव द्या

रुग्णांना आवश्यक सेवा न देणाऱ्या रुग्णालयाचे नाव पॅनलमधून कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. याचबरोबर विविध उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्तीच्या दरात वाढ करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदिवासी भागात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी दुर्गम भागातील एक ग्रामीण रुग्णालय व एक प्राथमिक आरोग्य केंद्र सामाजिक संस्थांकडे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव सादर करावा.

Ayushman Bharat Mission Maharashtra Committee Chief Dr. Omprakash Shete.
Dhule News : गावागावात सोमवारी दीपोत्सव साजरा करा : खासदार डॉ. सुभाष भामरे

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत माहिती उपलब्ध होण्यासाठी संकेतस्थळ तयार करण्याचा प्रस्ताव सादर करावा.

आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पॅनलवरील रुग्णालयाच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी डॉ. शेटे यांच्यासमोर मांडल्या त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

पहिल्या क्रमांकासाठी प्रयत्न करा

धुळे जिल्ह्यात आयुष्मान कार्ड तयार करण्याचे काम जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यत चांगल्याप्रकारे सुरू असून उर्वरित कार्ड वितरणाचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करून धुळे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षाही डॉ. शेटे यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी श्री. गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके यांनी विविध योजनांची माहिती दिली.

Ayushman Bharat Mission Maharashtra Committee Chief Dr. Omprakash Shete.
Dhule News : मराठा समाजबांधव पदयात्रा आज मुंबईकडे रवाना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com