Jaykumar Rawal
sakal
धुळे: महापालिकेच्या नवरंग जलकुंभ परिसरातील ३० हजार चौरस फूट जागेत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नियोजीत जयहिंद सिटी मॉल व मंडईचे भूमिपूजन झाले. यात ५५ दुकाने असतील. त्यावर मल्टिप्लेक्स थिएटर, फूड कोर्ट, एस्किलेटर पायऱ्या (सरकते जिने), लिफ्ट आदी आधुनिक सुविधा असतील.