Dhule Jal Jeevan Mission
sakal
धुळे: ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ जिल्ह्यात अतिशय संथ गतीने सुरू आहे. ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेत जिल्ह्याचे लक्ष्य गाठायचे झाल्यास कामांची गती वाढवणे गरजेचे आहे. २०२५ संपत आले असताना जिल्ह्यात केवळ ४८ टक्के कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली असून, अजूनही ५२ टक्के कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रत्येक घरात पाणी कधी पोहोचणार हा प्रश्न भेडसावत आहे.