Dhule News : धुळ्यात बेशिस्तपणे उभ्या वाहनांना ‘जॅमर'! वाहतूक पोलिसांची कारवाई; सर्वत्र मोहीम राबविणार

Dhule News : दोन दिवसांपूर्वी शहरातील गरुड कॉम्प्लेक्सजवळ बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात आले. या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले.
Traffic police jammer a vehicle illegally parked in front of Garuda Complex in the city.
Traffic police jammer a vehicle illegally parked in front of Garuda Complex in the city.esakal
Updated on

Dhule News : शहरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग करण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता वाहतूक पोलिसांतर्फे वाहनाला जॅमर लावण्याची कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील गरुड कॉम्प्लेक्सजवळ बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांना जॅमर लावण्यात आले. या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले. (Dhule Jammer for vehicles parked in city)

शहरात साधारण सर्वच भागात बेशिस्तपणे वाहने पार्क करण्याचा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. अगदी वर्दळीच्या ठिकाणी देखील मनाला पटेल अशा पद्धतीने वाहने लावायची आणि आपल्या कामासाठी निघून जायचे अशी पद्धत रूढ झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसह वादावादीचे प्रकार होतात. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे.

त्यात अरुंद रस्ते, रुंद रस्ते असले तर तेथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अशा समस्या पाहायला मिळतात. त्यात पुन्हा बेशिस्त वाहन पार्किंग त्यामुळे समस्येत भरच पडते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीतून वाहन काढताना शिस्तीने वागणाऱ्या नागरिक, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते, मनस्ताप सहन करावा लागतो. (latest marathi news)

Traffic police jammer a vehicle illegally parked in front of Garuda Complex in the city.
Nashik News : निमाणी बसस्थानकाला अवकळा; खड्डे, साचणाऱ्या पाण्याने त्रास

त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी जॅमर मागविण्यात आले असून रस्त्यावर लावलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना हे जॅमर लावण्यात येत आहेत. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्या पथकातील विनायक सैंदाणे, संदीप ठाकरे, जितेंद्र आखाडे, विवेक वाघमोडे, मनोहर महाले, विलास मालचे, तौसिफ शेख, भूषण शेटे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, दंडाची रक्कम भरल्यानंतरच संबंधित वाहने सोडण्यात येणार आहेत. यापुढे शहरात सर्वत्र ही मोहीम राबविली जाणार असल्याने वाहनधारकांनी पार्किंगमध्ये वाहने लावावीत असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनी केले आहे.

Traffic police jammer a vehicle illegally parked in front of Garuda Complex in the city.
Dhule Ladki Bahin Yojana : महिलांनी घाईगर्दी करु नये : जिल्हाधिकारी; लाडकी बहीण साठी 31 ऑगस्टपर्यंत नोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.