Dhule News : ‘जीव’ पाड्यावरील भाऊबंदतील संघर्षाची कथा; आदिवासी कोकणी भाषेतील पहिलाच मराठी चित्रपट

Dhule : मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील लाव्हरीपाडा-शिवाऱ्यामाळ, मस्टयाचा पाडा, रोहड तसेच काबऱ्याखडक या चौपाळे पंचक्रोशीत झाले.
Dhule News : ‘जीव’ पाड्यावरील भाऊबंदतील संघर्षाची कथा; आदिवासी कोकणी भाषेतील पहिलाच मराठी चित्रपट

Dhule News : रेन्बो माईंड्स प्रेझेंट, श्री रवींद्र माणिक जाधव लिखित दिग्दर्शित व उषा रवींद्र जाधव निर्मित ‘जीव’ (The Creature)’ या आदिवासी कोकणी भाषेतील महाराष्ट्रातील पहिल्याच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील लाव्हरीपाडा-शिवाऱ्यामाळ, मस्टयाचा पाडा, रोहड तसेच काबऱ्याखडक या चौपाळे पंचक्रोशीत झाले. चित्रपटाच्या संकलनाचे काम डिजी पिक्चर स्टुडिओ पुणे येथे नुकतेच पूर्ण झाले आहे. (snapshots of shooting in western belt of Pimpalner for movie Jeev )

चित्रपटाचे संकलन अक्षय कदम व अभय पोते यांनी केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आकाश बनकर तर साउंड रेकॉर्डिंगचे काम विकास खंदारे, कलादिग्दर्शन प्रसाद भिल यांचे आहे. चित्रपटास दिग्दर्शन साह्य अभय पोते, विशाल शिरसाठ तसेच वेशभूषेचे काम प्रथमेश तांबे व रेश्मा सुनील जाधव यांनी तर चित्रपटाचे इंग्रजी सब टायटल्स प्रा. रोहिदास घरटे व प्रा. नूतन घरटे (परफेक्ट क्लासेस पिंपळनेर) यांनी केले आहे.

हा चित्रपट लवकरच पिंपळनेर परिसरात तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दल रवींद्र जाधव यांनी सांगितले की, या भागात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना आजूबाजूच्या स्थानिक लोकांची बोलीभाषा, जुन्या चालीरिती-परंपरा, दुर्मिळ लोककला प्रकार, संगीत वाद्ये, जीवनशैली तसेच संस्कृती या सर्व गोष्टींच्या संवर्धनासाठी ‘जीव’ निर्माण केला आहे.

दुर्मिळ होणारी आदिवासी कोकणी बोलीभाषा स्थानिकांच्या बोलण्यातून आत्मसात करून या भाषेतूनच चित्रपटाची कथा लिहिली. कथा २०१८ साली त्यांना एका प्रसंगावरून सुचली. चार ते पाच वर्ष या कथेवर काम करून हा चित्रपट या परिसरातील आदिवासी बांधवांच्या सहकार्याने आकाराला आला आहे. जाधव यांनी २०१३ पासून शाळाबाह्य, निरोध, थाळसर-बांगसर, गोल यासारख्या लघुपटांचे या भाषेतूनच स्वतः लेखन-दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. (latest marathi news)

Dhule News : ‘जीव’ पाड्यावरील भाऊबंदतील संघर्षाची कथा; आदिवासी कोकणी भाषेतील पहिलाच मराठी चित्रपट
Dhule News : मेंढपाळ बांधव, मेंढ्यासह रास्ता रोको! महिला, युवतीसह चिमुकल्यांचाही सहभाग; वाहतूक ठप्प

यातील थाळसर-बांगसर या लघुपटास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली, यांचे २०२० चे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ‘जीव’ चित्रपटात पाड्यावरील कुटुंब व भाऊबंद यांच्यातील संघर्ष असून चित्रपटाची कथा विषय पूर्णतः वेगळ्या पातळीवरचा आहे. जीव हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार असून प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल जाधव यांना उत्सुकता आहे.

‘जीव’ चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रतिभा चौरे, हिंमत साबळे, धनराज उंबरे, प्रशांत साबळे, शशिकांत साबळे, शंकर चौरे, सद्दाम पटेल, सतीश खैरनार, अनिल बोराडे, सतीश पेंढारकर, वासुदेव राजाराम सोनवणे, कैलास बहिरम, चेतन बहिरम, ईश्वर ठाकरे, संभाजी आंधळे, श्रीकांत अहिरे, विक्रम पोते, जयवंत कापडे, सतीश पेंढारकर तसेच स्थानिक पोलिस स्टेशन पिंपळनेर येथील मान्यवर व वृत्तपत्राचे वार्ताहर, प्रशांत जगताप (स्वामी इलेक्ट्रिकल्स), नीलेश सोनवणे (बालाजी इलेक्ट्रिकल्स जनरेटर साह्य), साक्री पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, तसेच सावरपाडा शिवाऱ्यामाळ, लाव्हरीपाडा, मस्टयाचा पाडा, चौपाळे पंचक्रोशीतील स्थानिक पदाधिकारी-ग्रामस्थ तसेच अनेक हातांनी मोकळ्या मनाने सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

असे आहेत कलाकार

चित्रपटात प्रमुख भूमिकेत शिवाजी अप्पा शेवाळे (चिकसे), किरण वडसकर (पिंपळनेर), दीक्षा उजागरे (पुणे), बेबीताई लक्ष्मण सूर्यवंशी (नागझिरी), आदर्श सुनील जाधव (पुणे) , मकडीबाई सूर्यवंशी (नागझिरी), समीर रामटेके (नागपूर), उषा निंबाळकर (पेनूर), रवींद्र माणिक जाधव, नितीन नगरकर (पिंपळनेर), दोधाभाऊ गायकवाड, गुलारामभाऊ चौरे, मालतीबाई छोटीराम चौरे, छोटीराम गजमल चौरे (सावरपाडा चौ.), बबन माळचे, दया अहिरे, साईराम सोनवणे (लाव्हरीपाडा), मनीषा साबळे (नागझिरी) तसेच लाव्हरीपाडा व सावरपाडा चौ. येथील स्थानिक कलाकारांनी अभिनय केला आहे.

Dhule News : ‘जीव’ पाड्यावरील भाऊबंदतील संघर्षाची कथा; आदिवासी कोकणी भाषेतील पहिलाच मराठी चित्रपट
Dhule News : लोंबकळणाऱ्या वीज तारांचा धोका; प्रभाग अकरामधील समस्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com