Dhule Legislative Council Elections : शिक्षक मतदारसंघासाठी दहा जूनला मतदान : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule News : नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषद झाली
Abhinav Goel
Abhinav Goelesakal

धुळे : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला. त्यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी दहा जूनला (सोमवार) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली. (Dhule Legislative Council Elections Voting for Teachers Constituency on June 10)

नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषद झाली. श्री. गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रम असा

जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, की नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (ता. १५) अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत बुधवारी (ता. २२) असेल. नामनिर्देशन पत्रांची शुक्रवारी (ता. २४) छाननी होईल.

सोमवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असले. दहा जूनला मतदानानंतर १३ जूनला मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया १८ जूनला पूर्ण होईल. या निवडणुकीसाठी नावनोंदणी केलेले शिक्षक मतदार मतदान करण्यास पात्र राहतील.

आठ हजारावर मतदार

या निवडणुकीसाठी नाशिक विभागीय महसूल आयुक्त निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर धुळे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी धुळे जिल्ह्यात ८ हजार १३१ शिक्षक मतदार आहे.

अंतिम मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणीची प्रक्रिया उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १२ मेपर्यंत सुरू असेल. शिक्षकांनी या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणीसाठी वाट न बघता तत्काळ मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही श्री. गोयल यांनी केले. (latest marathi news)

Abhinav Goel
Dhule News : जिल्हा बँकेतर्फे 263 कोटींचे खरीप पीककर्ज! धुळे- नंदुरबारच्या 22 हजारांवर सभासद शेतकऱ्यांना लाभ

मतदार नोंदणीची सूचना

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवासी असलेले आणि एक नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून काम केलेल्या व्यक्ती मतदार नोंदणीसाठी पात्र असतील.

शिक्षक मतदार नोंदणीसाठी सुधारीत अर्ज क्रमांक १९ भरून, त्यासोबत निवासाचा पुरावा आणि विहित नमुन्यातील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. मतदाराने अर्जात आधार क्रमांक नमूद करणे ऐच्छिक असेल आणि आधार क्रमांक दिला नाही म्हणून अर्ज नाकारला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मतदाराचा आधार तपशील सार्वजनिक केला जात नाही, असे श्री. गोयल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मतदार संख्या

मतदार यादीनिहाय भागाचे नाव व एकूण मतदार संख्या (कंसात मतदार संख्या) ः साक्री- पुरुष ७१७, स्त्री १५१, पिंपळनेर- पुरुष ५६४, स्त्री १३२, दोंडाईचा- पुरुष ३८३, स्त्री १५९, शिंदखेडा- पुरुष ५०७ स्त्री १०६, शिरपूर- पुरुष १४१७, स्त्री ४९५, धुळे ग्रामीण- पुरुष १३४१, स्त्री २६९, धुळे शहर- पुरुष १२७३, स्त्री ६१७, असे एकूण ८ हजार १३१ मतदार आहेत.

तसेच कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनावर लक्ष ठेवण्यासाठी फिरते पथक कार्यान्वित करण्यात येणार असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विविध कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील संभाव्य उमेदवार, मतदार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले.

Abhinav Goel
Amit Shah Dhule Sabha : गृहमंत्री अमित शहांची सोमवारी धुळ्यात सभा! डॉ. सुभाष भामरे यांचा प्रचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com