Dhule Lemon Rate Hike : लिंबू सध्या खातोय भाव! दर 150 रुपये किलोपर्यंत

Lemon Rate Hike : पुरेशा पावसाअभावी ठिकठिकाणी टंचाई, तर शहरासह परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे.
Lemon
Lemonesakal

Dhule Lemon Rate Hike : पुरेशा पावसाअभावी ठिकठिकाणी टंचाई, तर शहरासह परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. दुसरीकडे बाजारात लिंबाची मागणी व दरही वाढले आहेत. बाजारात काही दिवसांपासून १४० ते १५० रुपये किलोने लिंबू विक्रीस आहेत. महिन्यापासून लिंबाचे दर वाढले आहेत. वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अन्य जिल्ह्यात लिंबू विक्री केल्यामुळे दर वाढले असल्याचे स्थानिक भाजी विक्रेत्यांनी सांगितले. ()

उन्हाचा पारा सध्या सरासरी ४१ ते ४२ अंशांवर पोचल्याने धुळेकरांना चटके सहन करावे लागत आहेत. उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने शीतपेये, लिंबूपाणी पिण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार समितीसह घाऊक बाजारातदेखील लिंबाच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दीडशे रुपये प्रतिकिलोपर्यंत लिंबाचे दर पोचले होते. सध्या १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने लिंबू बाजारात मिळत आहेत. एका लिंबासाठी पाच रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. (latest marathi news)

Lemon
Nashik Lemon Rate Hike : उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाचा वाढला तोरा ! एका लिंबासाठी 10 ते 15 रुपये मोजण्याची वेळ

मागणीत वाढ

वाढत्या उन्हापासून बचाव होण्यासाठी शरीराला गारवा मिळावा यासाठी नागरिकांचा कल शीतपेय, लिंबूपाणी, आइस्क्रीम, गोला, कूल्फी यांसारखे थंड पदार्थ सेवन करण्याकडे आहे. उन्हाळ्यात लिंबाची मागणी प्रचंड वाढत असल्याने त्याचे दर वाढले आहेत. सध्या ठोक बाजारात लिंबाचे दर १४० ते १५० रुपये प्रतिकिलोने आहेत. बाजारात लिंबू खरेदी करताना ग्राहकांना एका लिंबासाठी पाच रुपये मोजावे लागत आहेत.

यावरून बाजारात लिंबू सध्या चांगलाच भाव खात असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लिंबांचे उत्पादन घेतले जात असते. मात्र, वाढत्या मागणीमुळे गरज पूर्ण होत नसल्याने बाहेरील जिल्ह्यांसह राज्यातून लिंबू विक्रीसाठी आणले जात आहेत. याचा परिणाम लिंबाच्या दरवाढीवर झाला आहे. लिंबाच्या आकारानुसार त्यांच्या दरात चढ-उतार होत आहे. लिंबू आहारात गरजेचा असल्याने त्याच्या खरेदीवर फारसा फरक जाणवत नसल्याचे दिसून येते.

Lemon
Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com