Dhule Lok Sabha Constituency : पहिल्या महिला उमेदवार बच्छावांच्या लढतीकडे लक्ष; काँग्रेसचे डॉक्टर कुटुंब प्रचारात

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. उमेदवारांचे कुटुंबही अंगाची काहीली होणाऱ्या उन्हात ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituencyesakal

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापत चालले आहे. उमेदवारांचे कुटुंबही अंगाची काहीली होणाऱ्या उन्हात ताकदीनिशी रिंगणात उतरले आहेत. स्वातंत्र्यानंतर अवलोकन केले असता काँग्रेसने या मतदारसंघातील निवडणुकीत ७२ वर्षांत प्रथमच महिलेला उमेदवारी देत मतदारांचे लक्ष वेधले आहे. रणरणत्या उन्हातील प्रचारात नशीब आजमावणाऱ्या काँग्रेसच्या महिला उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. ()

चुरशीच्या लढतीत डॉ. बच्छाव यांचे नशीब उजळते किंवा कसे याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवाराचा मान डॉ. शोभा बच्छाव यांनी पटकावला आहे. त्या पक्षांतर्गत उमेदवारीच्या स्पर्धेत नव्हत्या. त्यांचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत नव्हते.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपूर्वी पक्षश्रेष्ठींकडून त्यांचे नाव जाहीर झाले. प्रचाराच्या कमी कालावधीत मतदारसंघातील प्रस्थापितांचे आव्हान पेलण्याची महिला उमेदवार म्हणून डॉ. बच्छाव यांच्या कसोटीचा हा काळ ठरतो आहे. मतदारसंघातील घडामोडींचा वेध घेत जेव्हा काँग्रेस आणि भाजप, अशा सरळ लढतीवर शिक्कामोर्तब झाल्यावर डॉ. बच्छाव यांचे कुटुंब प्रचारात जुंपले आहे.

विरोधी मुद्दा खोडण्यावर भर

उमेदवार डॉ. बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघाबाहेरील उमेदवार असल्याचा युक्तीवाद पक्षांतर्गत सुरू झाला. हा मुद्दा विरोधकांनीही हेरला. तेथून निवडणुकीतील प्रचारात रंगत येऊ लागली. महाविकास आघाडीच्या सभांमधून नेत्यांसह डॉ. बच्छाव म्हणत आहेत, की धुळ्याची लेक आहे. सत्ता असताना काँग्रेसने धुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद बहाल केले होते. पक्षाची धुळे जिल्हा प्रभारी म्हणून वेळोवेळी जबाबदारी सांभाळली आहे. ( latest political news )

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : उमेदवार डॉ. सुभाष भामरे 15 कोटी रुपयांचे मालक; शपथपत्रात माहिती

धुळ्यातच शिक्षण झाले आहे. मालेगावची सूनबाई आहे. सहा विधानसभा क्षेत्र असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी नातेगोते आहे. नाशिकमध्ये नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री म्हणून कार्याचा ठसा उमटवला आहे, असे सांगत विरोधकांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार हा केवळ दिशाभूलीचा प्रचार होत असल्याचे डॉ. बच्छाव सांगत आहेत.

डॉक्टर कुटुंब प्रचारात

उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारही डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातही काँग्रेस उमेदवाराचा प्रतिस्पर्धी उमेदवारही महिला डॉक्टर होती. त्यामुळे उच्च विद्याविभूषीत उमेदवार रिंगणात असल्याने या दोन्ही मतदारसंघाने उत्तर महाष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसने ७२ वर्षांनंतर प्रथमच धुळे मतदारसंघात महिला उमेदवाराला संधी दिल्याने अत्यंत चुरशीची लढत होत आहे.

मतदारसंघात मतांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा फारसा उरला नसल्याने काँग्रेसने या संधीचे सोने करण्यासाठी कंबर कसली आहे. डॉ. शोभा बच्छाव, त्यांचे पती डॉ. दिनेश बच्छाव, कन्या डॉ. मयूरी बच्छाव, सुपुत्र डॉ. गौरव बच्छाव, डॉ. प्रियंका गौरव बच्छाव व नातेवाईक प्रचारात गुंतलेले आहेत. त्यांना पक्षाचे वरिष्ठ व स्थानिक नेत्यांचे भक्कम पाठबळ आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला कडवी लढत देताना डॉक्टर बच्छाव कुटुंब रिंगणात असल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : मराठा- पाटील फॅक्टर पुन्हा प्रभावी ठरणार? एकगठ्ठा मतदानाचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com