Dhule Lok Sabha Constituency : मोदी लाटेपुढे काँग्रेस निष्प्रभ; मालेगाव मध्य वगळता 2014 ला 5 ठिकाणी आघाडी

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत २००९ ला भाजपने विजयाकडे वाटचाल सुरू केली.
Narendra Modi
Narendra Modiesakal

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत २००९ ला भाजपने विजयाकडे वाटचाल सुरू केली. यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपच्या विजयाची पताका फडकली. त्यापुढे काँग्रेसचे डावपेच निष्प्रभ ठरले. मुस्लीमबहुल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता भाजपला उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली. (Dhule Lok Sabha Constituency)

काँग्रेसच्या उमेदवाराने शिरपूर विकासाचे ब्रँडींग करूनही फारसा उपयोग झाला नसल्याचे निकालाने दर्शविले. धुळे लोकसभा मतदारसंघाची २००९ ला फेरपुनर्रचना झाली. खुल्या संवर्गासाठी मतदारसंघ खुला झाल्याने या संधीचे सोने करत भाजपने विजय मिळवित काँग्रेसला नामोहरण केले.

या मतदारसंघात २००९ मधील निवडणुकीत सरासरी ४२.५३ टक्के मतदान झाले होते. नंतर २०१४ च्या निवडणुकीत सरासरी ५८.६८ टक्के मतदान झाले. यात एकूण १६ लाख ४३ हजार ७२० पैकी ९ लाख ८३ हजार ११६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पैकी नऊ लाख ८० हजार ५८० मते ग्राह्य ठरली होती.

विजयी मतांचा फरक

काँग्रेसचे उमेदवार आमदार अमरिशभाई पटेल यांचा २००९ मध्ये १९ हजार ४१९ मतांनी निसटता पराभव झाला होता. याउलट २०१४ मध्ये आमदार पटेल यांचा तब्बल १ लाख ३० हजार ७२३ मतांनी पराभव झाला होता. शिवसेनेमधून भाजपमध्ये प्रवेश आणि लागलीच उमेदवारी मिळाल्याने डॉ. सुभाष भामरे प्रथमच विजयी होत खासदार झाले होते. (Latest Marathi News)

Narendra Modi
Dhule Lok Sabha Constituency : यंदा साक्री तालुक्याची साथ कुणाला, भाजप की पुन्हा कॉंग्रेस?

मोदी लाटेच्या करिष्मामुळे या मतदारसंघात भाजपचे नशीब दुसऱ्यांदा चमकले, शिवाय डॉ. भामरे यांना संरक्षण राज्य मंत्रीपद लाभले होते. या निवडणुकीवेळीही काँग्रेसचे उमेदवार पटेल यांनी पर्यटनाच्या माध्यमातून शिरपूर विकासाचे दर्शन मालेगाव मध्य व बाह्य, बागलाण मतदारसंघातील मतदारांना घडविण्याचा प्रयत्न केला होता. या घडामोडींमुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती.

रिंगणात १९ उमेदवार

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात २०१४ ला एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. यात मुस्लीमबहुल भागातून ११, तर उर्वरित संवर्गाचे आठ उमेदवारांनी नशीब अजमावले होते. मुख्य लढत भाजप व काँग्रेसमध्येच झाली होती. धुळे ग्रामीण मतदारसंघातून भाजपला १ लाख ३० हजार १०२ व काँग्रेसला ५१ हजार ६६०, याप्रमाणे अनुक्रमे धुळे शहर मतदारसंघातून ९६ हजार ४४२ व ४९ हजार ४८७.

शिंदखेडा मतदारसंघात ९५ हजार ८५२ व ६२ हजार ५४६, मालेगाव मध्यला ५ हजार ७८६ व १ लाख ३३ हजार ३४६, मालेगाव बाह्यला १ लाख १२ हजार ५६२ व ४३ हजार ७६, बागलाण मतदारसंघात भाजपला ८६ हजार ७७ व काँग्रेसला ५७ हजार ४६३ मते मिळाली होती. मालेगाव मध्य वगळता भाजपला उर्वरित पाचही मतदारसंघात मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे विजय सुकर झाला.

Narendra Modi
Dhule Lok Sabha Election : मतदानास ओळखपत्राचे 12 पुरावे ग्राह्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com