Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसच्या नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरू! बंडखोरीबाबत 3 मेपर्यंत टांगती तलवार

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत यंदा काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य महिन्यांनतरही सुरूच आहे.
Balasaheb Thorat, Kunal Patil while discussing the candidature question of Congress Shyamkant Saner at his residence.
Balasaheb Thorat, Kunal Patil while discussing the candidature question of Congress Shyamkant Saner at his residence.esakal

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत यंदा काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य महिन्यांनतरही सुरूच आहे. यात उमेदवारी न मिळालेले धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांची समजूत काढण्याचे काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. (Dhule Lok Sabha Constituency)

सनेर सकारात्मक निर्णय घेऊन प्रचाराला लागतील, असा आशावाद थोरात यांनी व्यक्त केला तरी नाराजीनाट्याच्या दुसऱ्या अंकात बंडखोरीबाबत पक्षावर तीन मेपर्यंत टांगती तलवार राहणार असल्याचे चिन्ह आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटापैकी लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील जागा परंपरेनुसार काँग्रेसच्या वाटेला आली आहे.

परस्परांना विश्‍वासात न घेता काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पाडली गेल्याने काही इच्छुक उमेदवार आणि समर्थक कार्यकर्त्यांमध्ये अंसतोषाची ठिणगी पेटली. तिचा वणवा बंडखोरीच्या रूपाने पेटतो का हे पाहणे उचित ठरणार आहे. मतदारसंघात २६ एप्रिलपासून निवडणुकीची अधिसूचना आणि उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तिची तीन मेस अंतिम मुदत असेल.

गटबाजीचे दर्शन

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी बहाल केली. त्यामुळे नाराज इच्छुक उमेदवार नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी असंतोषाला वाट करून देत पक्षाचे राजीनामे स्विकारावे, असे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठविले. नाशिकमध्ये काही महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी असल्याने डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर झाला. (Latest Marathi News)

Balasaheb Thorat, Kunal Patil while discussing the candidature question of Congress Shyamkant Saner at his residence.
Dhule Lok Sabha Constituency : ज्येष्ठ- तरुणांच्या लढतीत काँग्रेसचे डावपेच निस्तेज

या माध्यमातून सनेर यांना अप्रत्यक्षरित्या `शॉक` देण्याचा प्रयत्न झाला. शिवाय पक्षाचे मेळावे, प्रचारार्थ बॅनरवरून डॉ. शेवाळे आणि सनेर यांचे छायाचित्र गायब झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय पक्षातील ज्येष्ठांना हाताशी धरून सनेर यांच्यावर टिकेचे पत्रकही काढले गेले आहे. त्यावरून काँग्रेसमधील गटबाजीचे दर्शन घडून येत आहे.

नेते थोरात धुळ्यात

काँग्रेसमध्ये विविध घडामोडी घडत असताना मेळाव्यानिमित्त बुधवारी (ता. २४) नेते माजी मंत्री थोरात धुळे दौऱ्यावर होते. त्यांनी नाराज जिल्हाध्यक्ष सनेर यांचे निवासस्थान गाठले. आमदार कुणाल पाटील उपस्थित होते. सनेर यांनी पक्ष प्रचाराला लागावे, नाराजी सोडावी, आगामी विधानसभा निवडणुकीवेळी सनेर यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही यासह विविध मुद्यांआधारे नेते थोरात यांनी सनेर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सनेर यांनी समर्थक कार्यकर्त्यांशी चर्चा आणि स्वतंत्र मेळाव्यातून भूमिका जाहीर करावी लागेल, अशी भूमिका मांडली. तसेच उमेदवारीसाठी अद्यापही इच्छुक असून तीन मेपर्यंत वाट पाहावी, असे सूचक विधान करीत सनेर यांनी टांगती तलवार ठेवल्याचे चित्र आहे. तसेच मेळाव्यास उपस्थितीबाबत सनेर यांनी नापसंती दर्शवत उमेदवारीसंदर्भात निर्णयावर उघड नाराजी प्रकट केली.

Balasaheb Thorat, Kunal Patil while discussing the candidature question of Congress Shyamkant Saner at his residence.
Dhule Loksabha Constituency : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांचा राजीनामा!

सर्वांचे काँग्रेसकडे लक्ष

काँग्रेसमधील विसंगत घडामोडींमुळे निवडणुकीपूर्वी वातावरणात रंगत भरली जात आहे. सनेर सकारात्मक भूमिका घेतील आणि पक्ष प्रचाराला लागतील, असा विश्‍वास नेते थोरात यांनी मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. सद्यःस्थितीत काँग्रेसच्या उमेदवार डॉ. बच्छाव यांचे मेळावे, बैठकांचे सत्र सुरू झाल्याने काँग्रेसचा उमेदवार बदलला जाणार नाही.

असे दर्शविण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू झाला आहे. नेते थोरात यांच्यासह उमेदवार डॉ. बच्छाव, आमदार पाटील यांच्याकडूनही सनेर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात कार्यकर्ता आणि नेत्यांमधील खल कसा व कुणासाठी फलदायी ठरतो हे जाणून घेण्याची मतदारसंघाला उत्सुकता असेल.

Balasaheb Thorat, Kunal Patil while discussing the candidature question of Congress Shyamkant Saner at his residence.
Dhule News : एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com