Dhule News : एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान!

Dhule News : महामंडळ प्रशासनाकडून या भागात येणाऱ्या बसच्या फेऱ्या कमी तर कुठे बंद करण्यात आल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी यांची अतोनात हाल सुरु झाले आहे.
ST Bus (file photo)
ST Bus (file photo)esakal

पिंपळनेर : ग्रामीण व आदिवासी बहुल भागातील शाळांना सुटी लागल्याने महामंडळ प्रशासनाकडून या भागात येणाऱ्या बसच्या फेऱ्या कमी तर कुठे बंद करण्यात आल्याने येथील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, प्रवासी यांची अतोनात हाल सुरु झाले आहे. (Dhule Loss of students due to closure of ST bus)

त्यामुळे सुट्ट्या लागल्याने बंद केलेल्या मार्गावरील बससेवा पूर्ववत करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी येथील विद्यार्थी, ग्रामस्थ, आणि प्रवासी यांनी केला आहे. पिंपळनेरसह पश्चिम पट्टा आणि आदिवासी बहुल भागातील विविध गावातून १२ वी, नर्सिंग कॉलेज.

आयटीआयसह विविध शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या गावी जात असतात. यासाठी ते नियमित पिंपळनेर आगारातून बसेसवर अवलंबून असतात. मात्र जिल्हा परिषद शाळांना सुट्टी लागल्याने मादलीपाडा धामणधर, मंडाने, लोहारदोडी, रोहड, राईनापाडा सह पंधरा ते वीस गावामधील एसटीच्या फेऱ्या १५ एप्रिल पासून कमी तर कुठे बंद करण्यात आल्या आहे.

यामुळे ५० ते ६० गावांचा संपर्क बंद होऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू लागले आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू असणाऱ्या एसटी बसेस सध्या बंद आहेत. त्यामुळे या सर्व मार्गावरील बस फेऱ्या नियमित करण्याची मागणी येथील विद्यार्थी करत आहे. (latest marathi news)

ST Bus (file photo)
Dhule Drought News : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दुष्काळामुळे शुल्क माफी लागू

प्रवाश्‍यांचे देखील हाल

तालुक्यातील मादलीपाडा, धामंदर, मंडाने, लव्हारदोडी, रोहड, राईनापाडा, धनेर या सकाळच्या पिंपळनेर डेपोतून सुटणारी एसटी बस ता. १५ एप्रिल पासून येत नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. सदरची बस येत नसल्याने विद्यार्थ्यांचे वर्ग व क्लास बुडत आहे.

या सकाळच्या एसटी बस बरोबरच मादलीपाडा ही मुक्कामी जानारी बस सकाळी तीच पिंपळनेरला परत येते त्यानंतर या आगारातून संपूर्ण दिवस या भागात कोणतीही बसची फेरी नाही. मादलीपाडा ते पिंपळनेर या भागात १५ ते २० खेडे गावांचा संपर्क येतो. या भागाची ही बस बंद करण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे विशेषता १२ वीच्या वर्ग सुरू झालेल्या व नर्सिंग कॉलेज, आयटीआय,टायपिंग सह विविध शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. यासह सध्या लग्नसराई असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. मात्र या भागातील बंद सेवा बंद झाल्यान आणि इतर खासगी वाहने तत्काळ उपलब्ध होत नसल्याने प्रवाश्‍यांचे देखील हाल होत आहे.

ST Bus (file photo)
Dhule Lok Sabha Constituency : ज्येष्ठ- तरुणांच्या लढतीत काँग्रेसचे डावपेच निस्तेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com