Dhule Lok Sabha Constituency : मराठा- पाटील फॅक्टर पुन्हा प्रभावी ठरणार? एकगठ्ठा मतदानाचा प्रश्‍न

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत मुस्लीम आणि मराठा- पाटील फॅक्टर प्रभावी तसेच निर्णायक ठरत असतो.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency esakal

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीत मुस्लीम आणि मराठा- पाटील फॅक्टर प्रभावी तसेच निर्णायक ठरत असतो. तुलनेत २००९ च्या निवडणुकीपासून मोदी लाटेबरोबर मराठा- पाटील फॅक्टर वजनदार ठरल्याने भाजपला काँग्रेसकडून हा गड हिसकवता आला. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणे बिघडल्यानंतर मराठा- पाटील फॅक्टर पुन्हा प्रभावी ठरणार का, तो भाजपला की काँग्रेसला लाभदायक ठरतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (Muslim and Maratha Patil factor is effective and decisive in election)

धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक विकासाच्या अजेंड्यासोबत जातीय समीकरणांच्या आधारावर होत असते. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा (जि. धुळे) आण मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण (जि. नाशिक) असे सहा विधानसभा क्षेत्र येतात. त्यापैकी धुळे शहर, मालेगाव मध्य मतदारसंघात मिळून सरासरी ३ लाख ६० हजार मतदार आहेत. उर्वरित सरासरी १२ ते १५ हजार मतदार दोंडाईचा, नरडाणा, सोनगीर व इतर भागात विखुरलेले आहेत.

मतपेढीला धक्का

अधिकतर मुस्लीम हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार मानले जातात. मात्र, या मतदारांमध्येही मतविभाजन करण्यास राजकीय मंडळींना यश आले. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी राजकीय पटलावर पाय रोवल्यानंतर त्यांच्याकडेही मुस्लीम समाज आकर्षित होऊ लागला. त्यामुळे काँग्रेसच्या एकगठ्ठा मतपेढीला धक्का लागला.

त्याचा लाभ काँग्रेसविरोधी भाजप पक्षाला होऊ लागला. त्यात मराठा- पाटील फॅक्टर येऊन मिसळल्याने भाजपच्या विजयाचे गणित सोपे झाल्याने वेळोवेळी निकालातून दिसून आले. यंदा मात्र ही स्थिती बदलल्याने भाजपची पंचाईत झाली आहे. (latest political news)

Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : महाशक्ती प्रदर्शनातून डॉ. भामरेंचा अर्ज!

सर्वाधिक मराठा- पाटील

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम रिंगणात नसल्याने मतविभाजनाचा प्रश्‍न उरलेला नाही. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होत आहे. काँग्रेसकडे मुस्लीम समाजाचे एकगठ्ठा मतदान आणि त्यात दलित, आदिवासी समाजाची मते मिसळणार आहेत. या स्थितीत मराठा- पाटील फॅक्टरही निर्णायक ठरणार आहे.

मतदारसंघात सर्वाधिक सरासरी साडेचार लाख मराठा- पाटील समाजाचे मतदार आहेत. हा मतदार आकर्षिक करण्याकडे भाजप आणि काँग्रेसचा अधिक कल असेल. त्यामुळे मराठा- पाटील समाजाच्या निर्णयावर या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल.

जातीय समिकरणावर भर

काँग्रेसने २००९ आणि २०१४ मधील निवडणुकीत जातीय समीकरणांना महत्त्व देण्याऐवजी विकासाला प्राधान्य देत शिरपूरस्थित माजी शालेय शिक्षणमंत्री तथा विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांना उमेदवारी दिली. तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. दुसरीकडे भाजपने विकासाचा अजेंडा हाती घेत मराठा- पाटील चेहरा देण्याला पसंती दिली. त्यात शिवसेनेतून भाजपमध्ये आणि विजयानंतर लगेचच संरक्षण राज्य मंत्रीपद बहाल करत डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीचा घेतलेला निर्णय योग्य होता, असे भाजपने दाखवून दिले.

Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : दुरंगी की तिरंगी...लढतीचे तूर्त त्रांगडे! वंचित बहुजन आघाडी छाननीत बाद

काँग्रेसला समज...पण

या झटक्यानंतर काँग्रेसने २०१९ च्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने मराठा- पाटील चेहरा दिला. तरीही मोदी लाट आणि मराठा- पाटील फॅक्टरच्या बळावर दुसऱ्यांदा उमेदवारी करणारे डॉ. भामरे विजयी झाले. या तीनही निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांद्वारे मतविभाजनाचे प्रयत्न झाल्याने काहीअंशी काँग्रेसचा तोटाही झाला.

यंदा २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आणि भाजपकडून तिसऱ्यांदा डॉ. भामरे उमेदवार असल्याने मुस्लीम फॅक्टरपाठोपाठ मराठा- पाटील फॅक्टर कितपत प्रभावी ठरतो आणि तो कुणाला तारतो याकडे राज्याचे लक्ष असेल.

Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : चौघांच्या माघारीनंतर रिंगणात 18 उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com