Dhule Lok Sabha Constituency : प्रत्येक मतदाराने जिल्ह्याच्या नावे विक्रम नोंदवावा : पालकमंत्री गिरीश महाजन

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या धुळे जिल्ह्यात २० मेस मतदान होणार आहे.
Girish Mahajan saluting the road traffic on the police drill ground on the occasion of Maharashtra Day. Neighbors Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade.
Girish Mahajan saluting the road traffic on the police drill ground on the occasion of Maharashtra Day. Neighbors Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade.esakal

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या धुळे जिल्ह्यात २० मेस मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्याच्या नावे सर्वाधिक मतदानाच्या विक्रमाची नोंद करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. (Guardian Minister Girish Mahajan statement )

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

मंत्र्यांचे आवाहन

पालकमंत्री महाजन यांनी महाराष्ट्र स्थापना दिनाचे महत्त्व विशद करत सांगितले, की लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी २० मेस मतदान होणार आहे. निवडणुका लोकशाहीचा महोत्सवच आहे. यात जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा.

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यात उन्हाच्या वाढत्या पाऱ्याचा जलसाठ्यांवर परिणाम होत आहे. या स्थितीत प्रत्येक नागरिकाने पाण्याचा थेंबन् थेंब वाचविला पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन आहे. (latest marathi news)

Girish Mahajan saluting the road traffic on the police drill ground on the occasion of Maharashtra Day. Neighbors Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade.
Dhule Lok Sabha Constituency : अब्दुल रेहेमान यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी; मत विभाजनाचा प्रश्‍न

सोहळ्यात पथसंचलन

जिल्हा पोलिस दल, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमाक ६, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा पोलिस दल (पुरुष), जिल्हा पोलिस दल (महिला), पोलिस प्रशिक्षण केंद्र, होमगार्ड, श्वानपथक, फॉरेन्सिक व्हॅन, चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक आदींचे संचलन झाले. त्याचे नेतृत्व पोलिस निरीक्षक मुकेश माहुले यांनी केले. आकाशवाणीच्या पूनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, तहसीलदार पंकज पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पावसाळ्यात प्रत्येक थेंब अडविण्यासाठी प्रयत्न करावा. वैयक्तिक रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवावा. दिवसेंदिवस वृक्षांची संख्या कमी होत असल्याने पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावावे.

Girish Mahajan saluting the road traffic on the police drill ground on the occasion of Maharashtra Day. Neighbors Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade.
Dhule Lok Sabha Constituency : उमेदवार डॉ. सुभाष भामरे 15 कोटी रुपयांचे मालक; शपथपत्रात माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com