Dhule Lok Sabha Election : ‘काँटे की टक्कर’ने सर्वांनाच घाम! धुळे लोकसभा मतदारसंघ निकालाची शेवटपर्यंत उत्कंठा

Lok Sabha Election : मोदींच्या सत्ताकाळात पाच वर्षे मंत्री व दुसरी पाच वर्षे खासदार राहिलेल्या डॉ. सुभाष भामरे यांची विजयाची हॅट्‍ट्रिक हुकली.
 Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal

Dhule Lok Sabha Election : आपलाच विजय होणार, असा भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रचंड विश्‍वास... दुसरीकडे बलाढ्य भाजपशी आपण प्रचारात दोन हात केले...जनतेने त्याला साथ दिली... त्यामुळे आपला उमेदवार विजयी होईल, अशी काँग्रेस महाविकास आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना अपेक्षा...अशा विश्‍वास-अपेक्षेच्या द्वंद्वात मतमोजणीतून येणाऱ्या निकालाची उत्कंठा सुरू झाली. (Dhule Lok Sabha Constituency Result Excitement till end of day )

निकालाच्या या उत्कंठेनेही पार शेवटच्या फेरीपर्यंत प्रतिस्पर्धी उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थकांसह यंत्रणेचा अक्षरशः घाम फोडला अन् अत्यंत अटीतटीच्या या लढतीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनी तीन हजार ८३१ मताधिक्याने बाजी मारली. त्यामुळे मोदींच्या सत्ताकाळात पाच वर्षे मंत्री व दुसरी पाच वर्षे खासदार राहिलेल्या डॉ. सुभाष भामरे यांची विजयाची हॅट्‍ट्रिक हुकली. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपचे पारडे जड वाटले.

मतदानाच्या विधानसभानिहाय टक्केवारीनंतर मात्र भाजप, काँग्रेसला विजयासाठी फिफ्टी-फिफ्टी संधी असल्याचे वातावरण निर्माण झाले. मात्र, दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे झाले. यातही भाजप आघाडीवर होता. अगदी मतमोजणीच्या आदल्या दिवशी काही उत्साही भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ. भामरे यांचे तिसऱ्यांदा खासदारकीचे बॅनरही झळकवून टाकले. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाल्यानंतरही डॉ. भामरेंच्या गोटात उत्साह पाहायला मिळाला.

दहा फेऱ्या डॉ. भामरेंच्या

मतमोजणी सुरू झाल्यानंतर अगदी पहिल्या फेरीपासून (दुसरी फेरी वगळता) डॉ. भामरे आघाडीवर पाहायला मिळाले. अगदी एकूण फेऱ्यांच्या साधारण निम्म्या फेऱ्यांपर्यंत अर्थात दहाव्या फेरीपर्यंत डॉ. भामरे यांनी ही आघाडी टिकवून ठेवली. त्यामुळे आधीच आत्मविश्‍वासाने भरलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. त्यामुळे मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या काही पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर डॉ. भामरे यांच्या विजयाचा गुलालही उकळून टाकला. (latest marathi news)

 Lok Sabha Election
Dhule Lok Sabha Election : मोदी- गांधी यांच्यापैकी कुणाची जादू चालणार?

...अन् काँग्रेसचा हुरूप वाढला

मतमोजणीच्या प्रारंभीच्या फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धी भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. भामरे यांनी लीड घेतल्याने काँग्रेस महाविकास आघाडीच्या गोटात तशी शांतता होती. अकराव्या फेरीनंतर मात्र काँग्रेसच्या उमेदवार डॉ. श्रीमती बच्छाव यांना आघाडी मिळण्यास सुरवात झाली. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही विजयाची आशा लागली.

फेरी दर फेरी डॉ. बच्छाव यांना आघाडी मिळत गेली. शेवटच्या अर्थात १९ व्या फेरीपर्यंत त्यांनी ही आघाडी टिकवून ठेवल्याने काँग्रेस मविआचा विश्‍वास दुणावला. शेवटी डॉ. बच्छाव यांचा विजय निश्‍चित झाला अन् काँग्रेस मविआच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.

फेरीनिहाय मतदान असे

फेरी...डॉ. सुभाष भामरे (भाजप- महायुती)...डॉ. शोभा बच्छाव (काँग्रेस-मविआ)

१...३३,८७५...३३,७७७

२...६४,१३४...७२,३६२

३...१,०४,९०४...१,०१,३६१

४...१,४०,९२४...१,३६,७०५

५...१,८०,८४०...१,६७,८३७

६...२,१६,३३३...२,०३,१९१

७...२,५४,८४७...२,३५,७२८

८...२,८६,८२३...२,७१,२९७

९...३,२१,४९४...३,०६,९९६

१०...३,५७,०१७...३,४५,९७८

११...३,८१,९१९...३,९५,०१३

१२...४,१३,७७४...४,३४,७३२

१३...४,५१,९१६...४,६८,८५४

१४...४,९०,७२९...४,९९,५०५

१५...५,२१,९८८...५,२५,१३०

१६...५,४५,९८६...५,४८,३०३

१७...५,६३,६९७...५,७२,७६५

१८...५,७१,३८१...५,७९,१७२

१९...५,७६,९९४...५,८२,१४९

२०,२१...५,८०,०३५...५,८३,८६६

पोस्टल बॅलेटची मते

डॉ. सुभाष भामरे...२,२५७

डॉ. शोभा बच्छाव...१,३७४

 Lok Sabha Election
Dhule Lok Sabha Election Vote Counting: मतमोजणी निरीक्षकांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी! मतमोजणी तयारीचा आढावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com