Dhule Lok Sabha Constituency : हिंदूत्व अन्‌ धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर जोर; भाजपसह काँग्रेसची प्रचार रणनीती

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशापयश विकासाबरोबर जातीय समीकरणांवर अवलंबून असते. त्यानुसार रिंगणातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून डावपेच आखले जातात.
BJP, Congress
BJP, Congress esakal

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशापयश विकासाबरोबर जातीय समीकरणांवर अवलंबून असते. त्यानुसार रिंगणातील विविध पक्षांच्या उमेदवारांकडून डावपेच आखले जातात. यंदा भाजपकडून हिदुत्वाचा मुद्दा प्रचाराच्या अग्रभागी असेल, तर काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा अधोरेखित करून लढा देण्याचा प्रयत्न करेल, असे चित्र आहे. (Dhule Lok Sabha Constituency)

धुळे लोकसभा मतदारसंघातील जागा काँग्रेस आणि भाजपच्या वाटेला आलेली आहे. विकासाबरोबर जातीय समीकरणांवरच या मतदारसंघातील विजयाची गणिते ठरत असतात. त्यादृष्टीने प्रचार, बैठकांचा रोख ठेवला जातो. धुळे मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात धुळे जिल्ह्यातील तीन, उर्वरित नाशिक जिल्ह्याच्या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

मुस्लीमबहुल भाग लक्ष्य

धुळे शहर व मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ मुस्लीमबहुल असल्याने या संवर्गातूनही उमेदवार दिला जात असतो. तसेच या मतदारसंघातील मुस्लीमबहुल भागातील एक गठ्ठा मतदान पारड्यात पडण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) ताकद लावली जाईल. हे दोन मतदारसंघ व उर्वरित मालेगाव बाह्य, बागलाण, धुळे ग्रामीण, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकाही बजावत असतात. (dhule political news)

BJP, Congress
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

प्रचाराची रणनीती

लोकसभेच्या धुळे मतदारसंघातही हिंदुत्त्वाचा मुद्दा निर्णायक कसा ठरू शकेल यादृष्टीने भाजप रणनीती आखत आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराची उभारणी, तसेच मोदी @ ९ याअंतर्गत झालेली विकासाची निरनिराळी कामे आणि राबविल्या जात असलेल्या योजना मतदारांवर बिंबविणे, अशी भाजपची प्रचार निती दिसते आहे.

काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केला नसल्याने या पक्षाचा नेमका अजेंडा समजू शकलेला नाही. मात्र, धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा काँग्रेसकडून निवडणुकीत मांडला जाईल, असा कयास बांधला जातो. लोकसभा निवडणूक भाजप व काँग्रेसकडून अतिप्रतिष्ठेची केली जाणार आहे. त्याप्रमाणे एमआयएम, जनता दल (सेक्युलर), बसपा, भारिप बहुजन महासंघ, केसीआर आदी विविध पक्षांचे उमेदवार कोण असतील यावरही निवडणुकीची रंगत अवलंबून असेल.

BJP, Congress
Baramati Loksbha: जानकरांनी मागितली बारामती लोकसभा; राष्ट्रवादीमधल्या फुटीचा फायदा उठवणार ?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com