Dhule Lok Sabha Constituency : नरडाणा ग्रोथ सेंटरसह विकासाची संथ गती; पायाभूत सुविधा उपलब्ध, तरीही येईना वेग

Lok Sabha Constituency : बोरविहीर- नरडाणा लोहमार्गाला जोडले जाणार असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या औद्योगिकीकरणाला वेग येणार आहे.
Nardana : Growth center panel.
Nardana : Growth center panel.esakal

विजयसिंह गिरासे : सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : नरडाणा (ता. शिंदखेडा) ग्रोथ सेंटर हे मुंबई-आग्रा महामार्ग व भुसावळ-सुरत लोहमार्गावर आणि होऊ घातलेल्या बोरविहीर- नरडाणा लोहमार्गाला जोडले जाणार असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या औद्योगिकीकरणाला वेग येणार आहे. पण यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच मुद्यावर निवडणूक लढविली गेली, काहीअंशी प्रश्न मार्गी लागत असले तरी केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असूनही पाहिजे तेवढा औद्योगिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ()

धुळे लोकसभा मतदारसंघात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दोन दशकांपासून हा मतदारसंघ भाजपच्या पाठीशी राहिला आहे. निवडणूक निकालात शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिका बजावत असतो. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटर विकासाकडे वाटचाल करीत आहे.

नरडाणेसह वारूड, जातोडा, वाघोदे, बाभळे, वाघाडी खुर्द व वाघाडी बुद्रुक आदी गावांतील शेतकऱ्यांनी त्यासाठी जमिनी दिल्या. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यामागचा उद्देश म्हणजे तालुक्यात औद्योगिकीकरण होणार, विविध कंपन्या आल्यानंतर तरुणांना रोजगारासह किरकोळ व्यवसाय करण्यासाठी हातभार लागेल, असा होता.

मात्र ‘खोदा कुवाँ, निकला चुवा’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. काही उद्योग येतात. मात्र सत्ताधाऱ्यांसह विरोधक प्रकल्पाला विविध कारणे पुढे करून विरोध करीत असल्याने उद्योजक कारखानदारी सुरू करण्यास फारसे धजावत नाहीत, हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

Nardana : Growth center panel.
Dhule Lok Sabha Constituency : निवडणूक खर्च निरीक्षकांतर्फे मालेगाव, बागलाणचा आढावा

पाणी, रस्ते, लोहमार्ग असूनही...

औद्योगिकीकरणासाठी महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. सुमारे दहा-बारा किलोमीटरवर असलेल्या तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज येथे मुबलक पाणीसाठा आहे. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक तीन हा ग्रोथ सेंटर जवळून जात असल्याने दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात आहेत. ग्रोथ सेंटरजवळून सुरत-भुसावळ हा लोहमार्ग जात असल्याने तालुक्यातील नरडाणासह बेटावद, होळ, शिंदखेडा, विखरण व दोंडाईचा येथे रेल्वेस्थानक आहेत.

प्रस्तावित मनमाड-इंदूर लोहमार्ग हा नरडाणा ग्रोथ सेंटरजवळून जाणार असल्याने औद्योगिक विकासाला पूरक बाबींची रेलचेल आहे. या पायाभूत सुविधा असतानाही शिंदखेड्याचा विकास का होत नाही? कायम दुष्काळी तालुका म्हणून असलेली ओळख का पुसली जात नाही, हे प्रश्न प्रत्येक लोकसभा निवडणुकीत ‘कळीचा मुद्दा’ म्हणून चर्चेला येतात. निवडणूक संपली, की राजकीय पक्षांना विसर पडतो, हे चित्र यंदा तरी बदलावे, ही अपेक्षा जनता बाळगून आहे.

Nardana : Growth center panel.
Dhule Lok Sabha Constituency : उमेदवार डॉ. सुभाष भामरे 15 कोटी रुपयांचे मालक; शपथपत्रात माहिती

भूखंड विनाप्रकल्प अडकून!

नरडाणा ग्रोथ सेंटरसाठी ३५५ हेक्टर जमीन संपादित झाली असून, त्यापैकी सरासरी ४० टक्क्यांवर जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरू आहेत. उर्वरित भूखंड विनाप्रकल्प काही व्यक्ती, भूमाफियांनी अडकवून ठेवले आहेत. त्यामुळे गरजू उद्योजकांना जमिनी मिळत नसल्याने अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीपासून मुकावे लागत आहे. या सर्व स्थितीचा परिणाम नरडाणा ग्रोथ सेंटरमध्ये नव्याने गुंतवणूक होत नाही. आर्थिक उलाढालीला संधी राहत नाही. अजून ३५० हेक्टर जमीन ग्रोथ सेंटरसाठी आवश्यक आहे.

अडीच दशकांची राजकीय वाटचाल

शिंदखेडा तालुक्यासाठी भाग्यविधाती ठरणारी बुराई-प्रकाशा उपसासिंचन योजना अडीच दशकापासून राजकीय पटलावर रेंगाळत आहे. ही योजना धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे. उपसासिंचन योजनेच्या ७९३ कोटी ९५ लाखांच्या सुधारित प्रकल्प अहवालाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. शिंदखेडा, नंदुरबार व साक्री तालुक्यांतील सात हजार ८५ हेक्टर क्षेत्र यामुळे सिंचनाखाली येणार आहे. तिलाही गती मिळावी, ही जनतेची अपेक्षा आहे.

Nardana : Growth center panel.
Dhule Lok Sabha Constituency : 31 इच्छुकांकडून सव्वासात लाख प्राप्त; उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com