Dhule Lok Sabha Constituency : तिघा `बाबां`चा बोलबाला अन्‌ प्रचारात रंगत...! जलदूतची उपाधी ते शाहू महाराजांच्या वारसामुळे सर्वत्र चर्चेत

Lok Sabha Constituency : जिल्ह्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघापासून ते कोल्हापूर मतदारसंघापर्यंत सध्या `बाबां`चाच बोलबाला आहे.
Dr. Subhash Bhamre
Rajavardhan Kadambande
Kunal Patil
Dr. Subhash Bhamre Rajavardhan Kadambande Kunal Patilesakal

Dhule Lok Sabha Constituency : जिल्ह्यासह लोकसभेच्या धुळे मतदारसंघापासून ते कोल्हापूर मतदारसंघापर्यंत सध्या `बाबां`चाच बोलबाला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वारस बाबा अर्थात भाजपचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे असल्याने त्यांना कोल्हापूरच्या प्रचार सभेत पाचारण केले गेले. भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे उपाख्य बाबा यांना जाहीर सभेत पाणीवाले बाबा उपाधी दिली गेली, तर काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील उपाख्य बाबा यांना समर्थकांनी जलदूत उपाधी बहाल केली. हाही धागा पकडत निवडणुकीत रंगतदार प्रचार होत आहे. ( title of Jaldoot is widely discussed due to Shahu Maharaj legacy)

राजकीय पटलावर विद्यमान खासदारांना डॉ. सुभाषबाबा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदारांना राजूबाबा, तर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदारांना कुणालबाबा म्हणून ओळखले जाते. तिघा बाबांनी कार्यकर्तृत्वाने समाजावर वेगळी छाप पाडली आहे.

समाजकारण आणि राजकारण करताना समाजाप्रती बांधिलकी, तसेच चाकोरीबाहेर जाऊन सेवाभाव जोपासण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सत्तेच्या बळावर विविध प्रलंबित महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यापासून ते ट्रस्टच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात तिघा बाबांनी वाटचालीत कसोशीने प्रयत्न केला आहे.

पाणीवाले बाबा

धुळे लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. भामरे यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपसह महायुतीतर्फे जाहीर सभा झाली. तीत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. भामरे यांना पाणीवाले बाबा उपाधी दिली.

धुळे व शिंदखेडा तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना आणि धुळे शहरासाठी महत्त्वांकाक्षी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मार्गी लावत त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास डॉ. भामरे यांनी प्राधान्य दिल्याने पालकमंत्र्यांनी डॉ. भामरे यांना ‘पाणीवाले बाबा’ ही उपाधी दिली. (latest marathi news)

Dr. Subhash Bhamre
Rajavardhan Kadambande
Kunal Patil
Dhule Lok Sabha Constituency : ज्येष्ठ- तरुणांच्या लढतीत काँग्रेसचे डावपेच निस्तेज

जलदूत पदवी

आमदार पाटील यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातील अनेक गावात त्यांच्या जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या माध्यमातून नाला खोलीकरण, रूंदीकरण, विस्तारीकरण, तसेच तलाव, बंधाऱ्यांचे पुनरूज्जीवन केले. त्यामुळे अनेक गावांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागला. शेती उत्पन्नात वाढ झाली. त्यांनी केलेल्या जलक्रांतीची दखल घेत मान्यवरांसह समर्थकांनी आमदार पाटील यांना जलदूत ही पदवी दिली. त्यामुळे जिल्ह्यात जलदूत कुणालबाबा, अशी नवी ओळख प्रस्थापित झाली.

शाहू महाराजांचे वारस

माजी आमदार कदमबांडे हे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार आहेत. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाली. त्यांनी ती माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. चार दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची कोल्हापूर येथे प्रचार सभा होती. त्या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माजी आमदार कदमबांडे यांच्यासाठी विशेष विमान पाठविले व त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतले.

सभा संपताना पंतप्रधान मोदी, श्री. शिंदे, श्री. फडणवीस यांनी माजी आमदार कदमबांडे यांच्याशी चर्चा करत त्यांना कोल्हापूरलाही प्रचारात सहभागी व्हावे, अशी सूचना केली. सध्या श्री. कदमबांडे हे भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून पक्षीय कामकाज पाहत आहेत.

Dr. Subhash Bhamre
Rajavardhan Kadambande
Kunal Patil
Dhule Lok Sabha Constituency : उमेदवार डॉ. सुभाष भामरे 15 कोटी रुपयांचे मालक; शपथपत्रात माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com