Dhule Lok Sabha Election : पंतप्रधानाच्या पेक्षाही जास्त मते ! पंडित नेहरूंनाही अवाक करणारा धुळे मतदारसंघ

Dhule Lok Sabha Election : कुठलीही निवडणूक असो, ती जनमाणसात खमंग चर्चेची पर्वणीच ठरते. शिवाय निवडणूक ही वैविध्यतेने पार पडत असते.
chudaman patil dhule lok sabha
chudaman patil dhule lok sabhaesakal

Dhule Lok Sabha Election : कुठलीही निवडणूक असो, ती जनमाणसात खमंग चर्चेची पर्वणीच ठरते. शिवाय निवडणूक ही वैविध्यतेने पार पडत असते. त्यामुळे काही आठवणी या चिरंतन स्मरणात राहणाऱ्या असतात. यात लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील एका निवडणुकीची आठवण तरळल्याशिवाय राहत नाही. माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा देशात सर्वाधिक मते मिळवत धुळे मतदारसंघातील स्वातंत्र्यसैनिक चुडामण आनंदा पाटील यांनी सर्वांना अवाक्‌ केले होते. (Dhule Lok Sabha Election)

यानंतर देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे संरक्षण खात्याचे मंत्रीपद लाभलेले डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे हा मतदारसंघ `हायप्रोफाईल` ठरला होता. देशाच्या राजकीय नकाशावर लोकसभेचा धुळे मतदारसंघ वेळोवेळी चमकला आहे. त्यातील ऐतिहासिक निकाल, घडामोडींमुळे हा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीपासून काँग्रेस आणि भाजप अशा दोन प्रमुख पक्षांमध्येच सत्तासंघर्ष चालत आला आहे. यंदाच्या निवडणुकीतही त्याचाच प्रत्यय येत आहे.

देशाचे वेधले लक्ष

धुळ्यातील पाटील कुटुंबांची देशात राजकीय घराणे म्हणूनही विशेष ओळख आहे. हे कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक (कै.) चुडामण आनंदा पाटील हे १९५२ ते १९६२ असे दहा वर्षे आमदार आणि नंतर १९७७ पर्यंत म्हणजेच पंधरा वर्षे खासदार राहिले. माजी पंतप्रधान (कै.) पंडित नेहरू यांच्यापेक्षा देशात अधिक मते मिळाल्याने चुडामण पाटील देशपातळीवर चर्चेत आले.

त्यातूनच पाटील कुटुंबाची गांधी घराण्याशी जवळीक झाली. पुढे चुडामण पाटील यांचा वारसा त्यांचे पुत्र राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील, नातू आमदार कुणाल पाटील यांनी आणखी समृद्ध केला आहे. चुडामण पाटील यांच्यानंतरही काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे. (latest marathi news)

chudaman patil dhule lok sabha
Loksabha Election 2024: उमेदवारांसाठी होत्या रंगीत मतपेट्या! वाचा भारतातील निवडणुकांचे रंजक किस्से

हायप्रोफाईल मतदारसंघ

२०१४ नंतर ३७ वर्षांनी या मतदारसंघातील निवडणूक हायप्रोफाईल ठरली. ती देशातील दुसऱ्या क्रमाकांचे संरक्षण खात्याचे मंत्रीपद लाभलेले डॉ. सुभाष भामरे यांच्यामुळे. भाजपमधून निवडून येत लागलीच त्यांना संरक्षण राज्यमंत्रीपद लाभले होते. पुढे २०१९ ला दुसरी निवडणूक लढविताना डॉ. भामरे यांची खासदार (कै.) चुडामण पाटील यांचे नातू आमदार कुणाल पाटील यांच्याशी गाठ पडली होती.

दोघेही राजकीय घराण्यातील असल्याने ही निवडणूक कमालीची चुरशीची आणि `हायप्रोफाईल` ठरली होती. मंत्री डॉ. भामरे यांचे वडील (कै.) रामराव पाटील धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते. बराच काळ कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले. डाव्या चळवळींचे ते अध्वर्यू होते. डॉ. भामरे यांच्या आई (कै.) गोजरताई भामरे या साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या.

निवडणुकांमधील इतिहास

कॉंग्रेसचे खासदार (कै.) चुडामण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत जनसंघाचे अध्यक्ष (कै.) नानासाहेब उत्तमराव पाटील यांचा सर्वाधिक मतांनी पराभव करून देशात विक्रम केला होता. तसेच कॉंग्रेस, शिवसेनेतून राजकीय प्रवास करत नंतर डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढविली. धुळे मतदारसंघाचे प्रथमच खासदार आणि प्रथमच मंत्रिपदाचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना भाजपने यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी बहाल केली आहे.

chudaman patil dhule lok sabha
Satara LokSabha : सातारा जातीयवादी विचाराकडे कधीही जाऊ देणार नाही; काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com