Dhule News : जुगलबंदी, ‘हास्यजत्रे’ने उद्या महोत्सव सुरू; पोलिस मैदानावर 5 दिवस ‘महासंस्कृती’ची मोफत मेजवानी

Dhule News : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने पोलिस मैदानावर सोमवारी (ता. २६) महासंस्कृती महोत्सवाला सुरवात होईल.
Abhinav Goyal inspecting preparations for Mahasanskriti Mahotsav at police ground on Saturday.
Abhinav Goyal inspecting preparations for Mahasanskriti Mahotsav at police ground on Saturday.esakal

Dhule News : लोकपरंपरेच्या दर्शनाची रॅली, शहनाई-तबला जुगलबंदी, शाहिरी शिवगर्जना आणि केबल वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने पोलिस मैदानावर सोमवारी (ता. २६) महासंस्कृती महोत्सवाला सुरवात होईल. पाचदिवसीय महोत्सवात धुळेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची अनोखी मेजवानी मिळेल.

स्थानिक आणि सिनेकलावंत सहभागी होणार असल्याने महोत्सव बहारदार होईल. धुळेकरांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले. (Mahasanskrit festival will begin with program Maharashtrachi Hasyajatra)

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासनतर्फे पोलिस कवायत मैदानावर १ मार्चपर्यंत महोत्सव चालेल. स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्यलढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे महासंस्कृती महोत्सव होत आहे.

यात सर्व कार्यक्रमांना नागरिकांना मोफत प्रवेश असेल. महोत्सवात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, बचतगट उत्पादन, वस्त्र संस्कृती दालन, वन्यजीव व छायाचित्र प्रदर्शन, तसेच बचतगट उत्पादनाचे दालन असेल.

सोमवारचे नियोजन

सोमवारी सकाळी साडेआठ ते अकरा शिवतीर्थ-महापालिका-राजवाडे संग्रहालय, बारापत्थर चौकमार्गे पोलिस कवायत मैदानापर्यंत ढोल-ताशा, लेझीम, कलशधारी मुली, कानुबाई देखावा, आदिवासी संस्कृती दर्शन, टिपरीनृत्य, वारकरी दिंडीचा समावेश असलेली रॅली निघेल. सकाळी अकराला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन होईल. लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित असतील.

आर. के. शहनाई ग्रुपतर्फे सायंकाळी पाचला शहनाई-तबला जुगलबंदी, सायंकाळी साडेपाचला सांगली येथील शाहीर पृथ्वीराज माळी यांचा ‘शाहिरी शिवगर्जना’ कार्यक्रम, तर सायंकाळी साडेसात ते दहापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कलाकार कार्यक्रम सादर करतील. (latest marathi news)

Abhinav Goyal inspecting preparations for Mahasanskriti Mahotsav at police ground on Saturday.
Jalgaon News : एरंडोल मतदारसंघात 17 कोटी शेत, पाणंद रस्त्यांसाठी मंजूर

मंगळवारचे कार्यक्रम

मंगळवारी (ता. २७) सकाळी दहाला येथील अंध मुला-मुलींचे गीतगायन, सकाळी साडेदहाला बोरकुंडचे मंडळ वहीगायन कार्यक्रम, श्री सद्‍गुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्थेतर्फे सकाळी अकराला खानदेशी लोककला आणि अहिराणी लोकगीत, दुपारी बाराला प्रा. केले मूकबधिर विद्यालय, सन्मती गतिमंद विद्यालय, नवजीवन अस्थिव्यंग शाळा.

श्री संस्कार गतिमंद मुलींचे बालगृह, दुसऱ्या सत्रात सायंकाळी पाचला श्री. बालन व सहकाऱ्यांचे भरतनाट्यम नृत्य, सायंकाळी साडेपाचला सिद्धांत बहुउद्देशीय संस्थेतर्फे नृत्याविष्कार, सायंकाळी सव्वासहाला एसव्हीकेएमतर्फे महाराष्ट्राची संस्कृती नृत्य, सायंकाळी साडेसहाला आबा चौधरी.

धीरज चौधरी व शिरपूरस्थित खानदेश किंग ग्रुप बजरंग बँड आपली मायबोली अहिराणी गीते, सायंकाळी साडेसातला मुंबईचे डॉ. सलील कुळकर्णी, संदीप खरे यांचे ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम होईल.

बुधवारी लोककला

बुधवारी (ता. २८) सकाळी दहाला गौतम बुद्ध बहुउद्देशीय संस्थेचा जागर लोककलेचा, सकाळी साडेदहाला पारिजात चव्हाण यांचा अंगणी पारिजात फुलला, सकाळी साडेअकराला जळगावच्या अनुभूती स्कूलचे बालनाट्य मारुतीची जत्रा.

Abhinav Goyal inspecting preparations for Mahasanskriti Mahotsav at police ground on Saturday.
Jalgaon News : मालेगावच्या सैफ अलीने गाजविला आखाडा

दुपारी साडेबारा ते एक चोपडा येथील दिनेश साळुंखे यांचे बाहुल्यांचे विश्व (कठपुतली), सायंकाळी पाचला अजिंक्य बगदे यांचा रायझिंग स्टार रॉक बँड, लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेतर्फे सायंकाळी साडेसहाला खानदेशी बाणा (गीत, गायन व नृत्य), सायंकाळी साडेसात ते रात्री दहापर्यंत ओमकार वसुधा अशोक सावंत यांचा वारी सोहळा संतांचा हा कार्यक्रम होईल.

गुरुवारी प्रात्यक्षिक

गुरुवारी (ता. २९) सकाळी दहाला राजेंद्र पवार यांचा जगणं तुमचं आमचं, कमलाबाई कन्या शाळेतर्फे सकाळी अकराला विधी हे बालनाट्य, दुपारी बाराला जे. आर. सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे मलखांब प्रात्यक्षिक, दुपारी साडेबाराला नटराज कलापथकातर्फे नारायण खताळ यांचा महाराष्ट्र दर्शन, सायंकाळी पाचला गंधार वाद्यवृंदाचा ‘रंगदे बसंती’.

सायंकाळी साडेसहाला शिरपूरस्थित प्रवीण माळी यांचे ‘आयतं पोयतं सख्यान’ एकपात्री नाट्य, सायंकाळी साडेसात ते रात्री दहापर्यंत ‘मोगरा फुलला’ हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित प्रा. गणेश शिंदे व सन्मिता शिंदे यांचा कार्यक्रम होईल.

पांचाळ यांच्यातर्फे शुक्रवारी समारोप

पोलिस मैदानावर शुक्रवारी (ता. १) महोत्सवाचा समारोप होईल. यात सकाळी दहाला तऱ्हाडी येथील संस्थेचा शाहीरी जलसा, सकाळी साडेदहाला कृष्णनगर हायस्कूलचा ‘बेलसर स्वारी’, सकाळी पावणेअकरा ते दुपारी एकपर्यंत कविसंमेलन, जळगावच्या परिवर्तन संस्थेचे सायंकाळी पाचला अरे संसार संसार (संगीत व नाट्य), तर सायंकाळी सातला जिल्हा प्रशासनामार्फत समारोपाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेसात ते दहापर्यंत मुंबई येथील भीमराव पांचाळ यांचा शब्दसुरांची भावयात्रा हा कार्यक्रम होईल.

Abhinav Goyal inspecting preparations for Mahasanskriti Mahotsav at police ground on Saturday.
Jalgaon News : अमळनेरला मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com