Navratri 2024 : आदिमातेच्या स्वागतासाठी महिलावर्गही सज्ज; घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली

Navratri 2024 : नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. ३) सुरवात होत आहे. याअनुषंगाने घरोघरी घट स्थापना होऊन आदिमातेचे आगमन होणार आहे.
Durga Mata idols available in market due to Navratri festival. The rush in the market on the eve.
Durga Mata idols available in market due to Navratri festival. The rush in the market on the eve.esakal
Updated on

धुळे : नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. ३) सुरवात होत आहे. याअनुषंगाने घरोघरी घट स्थापना होऊन आदिमातेचे आगमन होणार आहे. रास गरब्यासाठी घागरा, दांडिया आणि दागिन्यांनी शहरातील बाजारपेठ फुलली. घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य खरेदीलाही नागरिकांचा उत्साही प्रतिसाद आहे. यंदाच्या वर्षी घट नवरंगांतील वस्त्रांनी सजवला जाणार आहे. नवरात्रीच्या काळात लागणारे घट, फुले-फळे, पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ( market blossomed on eve of Ghatasthapana citizen ready to welcome Adimata )

त्यामुळे पितृपक्षामुळे मंदावलेली बाजारपेठ पुन्हा फुलण्यास सुरवात झाली. नवरात्रोत्सव म्हणजे सर्वत्र आनंद, उत्साह, भक्तिमय वातावरण असते. घरोघरी घटस्थापना करून विधीवत पूजन केले जाते. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठ फुलली. पुजेचे साहित्य, देवीच्या मूर्ती, उपवासासाठी लागणारी फळे, देवीच्या सजावटीसाठी लागणार्‍या साहित्यांचे स्टॉल ठिकठिकाणी लागले आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे आग्रा रोड, साक्री रोड, देवपूर परिसराला यात्रेचे स्वरुप आले.

नवरंगी वस्त्रांचा शृंगार

नवरात्रोत्सवात अर्थात नऊ दिवसात महिला नवरंगी साडी परिधान करतात. त्याप्रमाणे घटालाही नऊ रंगांची वस्त्रे असतील. सध्या नऊ रंगांतील वस्त्रे बाजारात उपलब्ध आहेत. घटस्थापनेला घटात श्रीफळ पूजले जाते. घटाभोवती टोपलीत माती ठेवली जाते. घटाची स्थापना हीच देवीची प्रतिष्ठापना, अशी आजवरची परंपरा आहे.

परंतु, आता दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, तुळजाभवानी आणि एकवीरादेवींचे मुखवटेही घटावर ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत. यंदाच्या वर्षी नऊ दिवसांपर्यंत देवीची विविध रूपांत पूजा बांधण्यासाठी पर्याय उपलब्ध असतील. तांब्याच्या वा मातीच्या कलशात पूजलेल्या श्रीफळाला देवीचे रूप म्हणून तिचा मुखवटा चढवता येईल. शिवाय नऊ रंगांतील वस्त्रेही असतील.

देवीच्या मूर्तींचे स्टॉल

गणेशोत्सवाप्रमाणे शहरात नवरात्रोत्सव मंडळांचीदेखील संख्या वाढली आहे. नवरात्रोत्सवाच्या एक दिवस आधीच देवीच्या मूर्ती खरेदीसाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बाजारात गर्दी केली. मुख्य बाजारपेठेतील देवपूरसह आग्रा रोड व पाचकंदील येथे विक्रेत्यांनी पूजाविधी साहित्यांची दुकाने थाटली आहेत. यावर्षी देवीच्या मूर्तीच्या किंमतीत जास्त वाढ झालेली नाही. अनेक मंडळांनी दुर्गा मूर्तींची बुकींग पंधरा दिवस ते एक महिना अगोदरपासून केली होती. (latest marathi news)

Durga Mata idols available in market due to Navratri festival. The rush in the market on the eve.
Navratri 2024 : दांडियासाठी दहाची डेडलाइन! अष्टमीला बारापर्यंत परवानगी; पावणेतीनशे मंडळांमध्ये रासदांडिया रंगणार

फळांना मागणी

अनेक भाविक नवरात्रोत्सवात नऊ दिवस उपवास करत असतात. अनेकजण एक वेळच आहार घेतात, तर काही फक्त फलाहार व पाण्यावरच उपवास करतात. या उपवासासाठी बाजारात फळे खरेदी करण्यासाठीदेखील गर्दी पाहायला मिळत आहे. केळी, सफरचंद, चिकू या फळांना या काळात मोठी मागणी असते. बाजारात सफरचंद १०० ते १२५ रुपये किलो, चिकू ७० ते ७५ रुपये किलो तसेच केळी २५ ते ४० रुपये डझन मिळत आहे. नवरात्रोत्सवात फळांचे भाव आणखी वाढू शकतात.

पूजासाहित्य उपलब्ध

नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविक विशेषतः महिलावर्ग मोठ्या भक्तीभावाने आदिमातेची पूजा करत असतात. त्यासाठी देवीचा साज म्हणून ओढणी, चुनरी, मंगळसूत्र, जोडवे, आरसा, कुंकवाचा करंडा, नथ, रिंग, चमकी आदी साहित्य खरेदी केले जाते. तसेच घटस्थापनेसाठी लागणारी ज्योत, टोपली, धूप, बडगी, दिवा, लाल कापड, लाल-हिरव्या बांगड्या, घट म्हणजे मडके, गुजराती पद्धतीची रंगीत मडकी, फुलोरा टांगण्यासाठी शिंके, हळदी-कुंकू, गुलाल, सिंदूर, सुपारी, बदाम, खारीक, गुगळ, धूप, पंचरंगी धागा, नारळ, नागलीची पाने, नवग्रह पूजा आदी वस्तू उपलब्ध आहेत.

घटाला नवरंगाचा साज

घटाच्या पूजेचे साहित्य २१ रुपयांत, नवग्रहाच्या पूजेचे ८१ रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. कलशाला म्हणजेच घटाला विविध वस्त्रांनी सजवण्यात येते. यात कोल्हापुरी साडी, घागरा पॅटर्न, खणाची साडी पूर्वीपासून उपलब्ध आहेत. यंदाच्या वर्षी नवरंगी वस्त्रांची नवलाई असेल, असे विक्रेत्यांनी सांगितले. महिला नवरात्रीत नऊ दिवसांत नवरंगांतील साड्या परिधान करतात. मागच्या वर्षीपासून या साड्या वा वस्त्र प्रावरणांवर घालण्यासाठी नवरंगी अलंकारही होते. मात्र, यंदा घटाला नवरंगांचा साज असेल.

गरब्याला येणार उधाण

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये सजावट झाली आहे. रोषणाई व सजावटीने मंदिरे सुशोभित करण्यात आली आहेत. मंदिरांमध्ये नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्वात शहरातील सार्वजनिक मंडळांतर्फे दांडिया, गरबा रासचे आयोजन केले जात असते. शहरातील विविध मैदाने, कॉलनी परिसर, सर्वाजनिकस्थळी दांडिया, गरबा रासचे आयोजन केले जाते.

Durga Mata idols available in market due to Navratri festival. The rush in the market on the eve.
Navratri 2024 : एक-दोन नव्हे तर पुण्यात आहेत देवीची इतकी मंदिरे, तुम्हाला माहितीयेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com