Gudi Padwa Festival : मांगल्याच्या गुढीसाठी धुळे बाजारात उत्साह

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत मोठा उत्साह
Gudi Padwa Festival
Gudi Padwa Festivalsakal
Updated on

धुळे- मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या चैत्र गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत मोठा उत्साह आहे. सणाच्या पूर्वसंध्येला शनिवारी धुळेकरांनी (ता. २९) पाडव्यासाठी मनमुराद खरेदी केली. शहरातील बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. जीवनात नवचैतन्य घेऊन येणारा गुढीपाडवा रविवारी (ता. ३०) साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली आहे. विविध साहित्यांची दुकाने थाटली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com