Dhule Market Committee Election : अखेर भाजप-भदाणे गटाची युती

dhule market committee
dhule market committeeesakal

Dhule Market Committee Election : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप व बाळासाहेब भदाणे गट यांच्यात युती झाल्याची घोषणा करण्यात आली. युतीतर्फे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. (Dhule Market Committee Election BJP Bhadane group alliance dhule news)

खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रमुख पदाधिकारी व बाळासाहेब भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांची रविवारी (ता. ९) यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती भाजप व भदाणे गट यांच्यात युती झाल्याचे व परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

खासदार डॉ. भामरे, सुभाष देवरे, माजी मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, गजानन पाटील, मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, संजय शर्मा, प्रभाकर पाटील, रामकृष्ण खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे बाजार समितीतील गेल्या २५-३० वर्षांपासूनची सत्ता उलथवून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीत आमूलाग्र बदल घडवून सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने युतीची घोषणा करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

dhule market committee
Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस बरसला, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला

दरम्यान, या युतीच्या माध्यमातून पुढील दिशा ठरविण्यासाठी मतदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा १२ एप्रिलला मेळावा घेण्यात येणार आहे. सकाळी नऊला खासदार डॉ. भामरे यांचे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथील संपर्क कार्यालय येथे हा मेळावा होईल. या मेळाव्याला उपस्थितीचे आवाहन बाळासाहेब रावण भदाणे, राम भदाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, संग्राम पाटील, शंकरराव खलाणे, आशुतोष पाटील, भाऊसाहेब देसले, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र माळी, जिल्हा परिषद सदस्य सुधीर जाधव, किशोर सिंघवी यांनी केले आहे.

dhule market committee
Nandurbar News : बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात हरवली पाणपोई!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com