Dhule News: मनपा हद्दीत अवैध नळजोडण्यांचा बाजार! अवधानमध्ये 45 कनेक्शन्स उघड; नियमाकुल करा अन्यथा दंडासह पोलिसांत गुन्हा

Dhule News : ज्यांच्याकडे अवैध नळजोडण्या असतील त्यांनी रीतसर अर्ज करून त्या नियमाकुल करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईसह पोलिसांत फिर्याद दिली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे.
Water Tap
Water Tapesakal

Dhule News : अमृत २.० योजनेंतर्गत अवधान येथे जलवाहिन्या अंथरण्याचे काम सुरू असताना तब्बल ४५ अवैध नळ कनेक्शन्स आढळून आली. त्यामुळे प्रशासन पुन्हा खडबडून जागे झाले. ज्यांच्याकडे अशा अवैध नळजोडण्या असतील त्यांनी रीतसर अर्ज करून त्या नियमाकुल करून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईसह पोलिसांत फिर्याद दिली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मनपा शाळा-२८ जलकुंभाच्या जलवाहिनीवर, चितोड भागात मोठ्या प्रमाणावर अवैध नळ आढळून आले. (Dhule market of illegal taps within municipal limits)

धुळे शहरासह हद्दवाढ क्षेत्रात अवैध नळजोडण्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ते सहजासहजी सापडत नाहीत, शिवाय आतापर्यंत महापालिकेच्या यंत्रणेनेही याबाबत दुर्लक्ष केल्याने ही समस्या कायम आहे. आता काही महिन्यांपासून मनपा पाणीपुरवठा विभागाकडून काही पावले उचलली जात असल्याचे दिसते. आता अमृत २.० अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याच्या कामादरम्यान अवधान येथे तब्बल ४५ अवैध नळजोडण्या आढळून आल्या. अशा अवैध नळजोडणीधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नियमाकुलची संधी

धुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरात एकल नळजोडण्यांची संपूर्ण माहिती संगणकीकृत होणे गरजेचे आहे. शहरातील विविध भागांत अवैध नळजोडणी असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कुणीही अवैध नळजोडणी घेतली असल्यास अशी नळजोडणी नियमाकुल करण्यासाठीची संधी देण्यात येत आहे. (latest marathi news)

Water Tap
Jalgaon News: निंभोऱ्यातून केळी वॅगन्सला ‘ग्रीन सिग्नल’! अखेर 12 वर्षांनंतर रेक दिल्लीकडे रवाना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

संबंधितांनी धुळे महापालिका पाणीपुरवठा विभागाशी तत्काळ संपर्क साधून आपल्याकडील नळजोडणी नियमाकुल करून घ्यावी, तसेच ज्या जोडणीधारकाकडे एकापेक्षा जास्त जोडण्या आहेत किंवा मंजूर जोडणीपेक्षा जास्त व्यासाची जोडणी आहे त्यांनीही धुळे महापालिकेशी संपर्क साधून आपली नळजोडणी/जोडण्या नियमाकुल करून घ्याव्यात. नंतर अशा अवैध नळजोडण्या आढळल्यास दंडात्मक कारवाई होऊन पोलिसांत फिर्याद दिली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

कारागीर, ठेकेदारांनाही इशारा

शहरात कोणत्याही ठिकाणी अवैधरीत्या नळजोडणी करताना आढळणाऱ्या भोगवटादार तसेच जोडणी करून देणारे नळ कारागीर अथवा ठेकेदार यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करून पोलिसांत फिर्याद दिली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला आहे. (latest marathi news)

Water Tap
Jalgaon Water Shortage: जिल्ह्याच्या पाणीपातळीत दीड ते दोन मीटर घट! भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल; कडक उन्हाळ्याचा परिणाम

सोमवारी पाणीपुरवठा बंद

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेवर साफसफाई व दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (ता. १०) या योजनेवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दर वर्षी पावसाळ्यापूर्वी तापी पाणीपुरवठा योजनेवरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्र येथील क्लॅरीफॅक्युलेटरमधील गाळ काढणे व साफसफाईचे काम करण्यात येते.

यंदा या कामासह तापी पाणीपुरवठा योजनेच्या सुकवद ते बाभळे रॉ वॉटर मुख्य जलवाहिनी तसेच बाभळे ते एमबीआर दरम्यानच्या मोठ्या गळत्यांची दुरुस्ती करण्याचे काम सोमवारी (ता. १०) महापालिकेकडून हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी तापी पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा बंद राहील.

परिणामी देवपूर नवरंग जलकुंभ, एमबीआर, वरखेडी रोड जलकुंभ, कबीरगंज जलकुंभ, जामचा मळा जलकुंभ, नाटेश्‍वर कॉलनी जलकुंभ येथून पाणीपुरवठा होणार नाही. याची त्या-त्या भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी व महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकार्य अभियंता नवनीत सोनवणे यांनी केले आहे.

Water Tap
Jalgaon News: उन्हाळी सुट्टीतील ‘संध्या शाळा’ ठरतोय लक्षवेधी! खोकरपाट शाळेत उपक्रमशील शिक्षक भैय्यासाहेब साळुंके यांचा पुढाकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com