MD Drugs
sakal
धुळे: उच्चभ्रू घटकाच्या पार्टीमध्ये अवैध वापरल्या जाणाऱ्या एमडी ड्रग्जची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने उघड केली. मोहाडी शिवारातील हॉटेल रेसिडेन्सी पार्कनजीक नवीन नागपूर-महामार्गावर कारला पकडले. त्यातील दोघांडून दहा लाख ४० हजारांचे एमडी ड्रग्ज, सात लाखांची कार आणि तीन मोबाईल, असा एकूण १७ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल शुक्रवारी (ता. २६) जप्त केला. ही ड्रग्जची जिल्ह्यात पहिली कारवाई ठरली.