धुळे- कोणतीही पूर्वसूचना न देता ‘एमआयडीसी’त वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि आर्थिक नुकसान होत आहे, असे म्हणत याप्रश्नी कुणावर तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी खानदेश औद्योगिक विकास परिषदेचे मुख्य प्रवर्तक नितीन बंग व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रिकल्चरचे ट्रस्टी कैलास अग्रवाल यांनी केली आहे. समस्येचे निराकरण न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.