धुळे: येथील सराईत गुन्हेगार परशुराम उर्फ पुरुषोत्तम रघुवीर परदेशी आणि शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्ट्या यास ‘एमपीडीए’अंतर्गत नाशिक येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा- सुव्यवस्था अबाधीत राहावी, सार्वजनिक शांतता टिकून राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली आहेत.