ST Bus
sakal
धुळे: दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे. दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विभागाने उपलब्ध ७३० बसद्वारे वाहतुकीचा ‘मेगाप्लॅन’ केला असून, पुणे आणि मुंबईसह प्रमुख शहरांतून परतणाऱ्या प्रवाशांसाठी तीन टप्प्यांत सेवा पुरविण्यात येणार आहे.