Encroachment
sakal
धुळे: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाला खीळ घालणाऱ्या अतिक्रमणांविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) शनिवारी (ता. ७) आक्रमक पवित्रा घेतला. लळिंग (ता. धुळे) टोलनाक्यापासून या धडक मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, महामार्गाच्या दुतर्फा असलेले अनधिकृत हॉटेल्स, टपऱ्या आणि दुकानांवर प्रशासनाने ‘हातोडा’ चालवला. अनपेक्षित सुरू झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांची मोठी तारांबळ उडाली.