सभापती, उपसभापतींची निवड 16 जानेवारीला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

धुळे - महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड 16 जानेवारीला होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

धुळे - महापालिकेच्या स्थायी समिती सभापती, तर महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवड 16 जानेवारीला होणार आहे. विभागीय आयुक्तांकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

महापालिका स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी आठ सदस्यांचा कार्यकाळ 1 जानेवारीला संपला, तर महिला बालकल्याण समितीच्या सर्व अकरा सदस्यांचा कार्यकाळ 22 जानेवारीला संपत आहे. या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य निवडीसाठी 28 डिसेंबरला विशेष महासभा झाली. या सभेत स्थायी समितीच्या आठ व महिला बालकल्याण समितीच्या सर्व अकरा सदस्यांची नव्याने निवड झाली. स्थायी व महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापती निवडीचा कार्यक्रम निश्‍चित करून देण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. विभागीय आयुक्तांनी हा कार्यक्रम निश्‍चित केला आहे. 

अकराला विशेष सभा 
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार 16 जानेवारीला विशेष सभा होईल. सकाळी अकराला स्थायी तर दुपारी एकला महिला बालकल्याण समिती सभापती, उपसभापतिपदासाठी निवडणूक होईल. बैठकीला विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे हे पीठासीन अधिकारी असतील.

Web Title: dhule municipal corporation