Dhule News : धुळे शहराचे मुख्य चौक होणार होर्डिंगमुक्त! अनधिकृत फलकधारकांना ४८ तासांची नोटीस

Municipal Commissioner Orders 48-Hour Notice to Hoarding Owners : धुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस यांनी प्रशासकीय महासभेत शहरातील मुख्य चौक होर्डिंगमुक्त करण्याचे तसेच ५० हजारांवर असलेल्या अनधिकृत नळ व ड्रेनेज जोडण्या अधिकृत करण्याचे तातडीचे निर्देश दिले.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

धुळे: शहरातील मुख्य चौक होर्डिंगमुक्तच हवेत. तसेच कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या, कर न भरणाऱ्या होर्डिंगधारकांना ४८ तासांची नोटीस द्यावी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसह थकीत रक्कम न भरल्यास संबंधितांची होर्डिंग अनधिकृत समजून काढून टाका, असे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन कापडणीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच अनधिकृत नळ व अनधिकृत ड्रेनेज कनेक्शनधारकांना डिमांड नोटीस देऊन ते अधिकृत करून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com