Municipal Election
sakal
धुळे: महापालिका निवडणुकीमुळे भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची मोठी भाऊगर्दी झाली आहे. ७४ पैकी ६० जागा लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपकडे तब्बल ५५० इच्छुकांनी शड्डू ठोकला आहे. मर्यादित जागा आणि नव्या- जुन्या इच्छुकांच्या या प्रचंड संख्येमुळे पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख लोकप्रतिनिधी कमालीच्या ‘स्ट्रेस’मध्ये (ताण) आहेत.