Faruk Shah
sakal
धुळे: आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी केली आहे. मनपा निवडणुक स्वबळावर लढण्याची आमची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. वरिष्ठांचा आदेश आला तर त्यावेळी त्या पध्दतीने भूमिका घेतली जाईल. परंतु, आमची तयारी स्वबळाची आहे. महापौर आमचाच होईल, असा दावा शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष फारुक शाह यांनी केला आहे.