Municipal Election
sakal
धुळे: महापालिकेच्या रणसंग्रामात आता राजकीय ध्रुवीकरणाला वेग आला असून, महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता युतीच्या वाटेवर आहेत. जागावाटपाच्या तिढ्यामुळे भाजपला रोखण्यासाठी हे दोन मित्रपक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्याने धुळेकरांना यंदा चुरशीची आणि नव्या समीकरणांची लढाई अनुभवावी लागणार आहे. परिणामी, ताकदवर भाजपपुढे स्वपक्षातील बंडखोरांसह मित्रपक्षांचेही तगडे आव्हान उभे ठाकणार असल्याने ही निवडणूक भाजपसाठी ‘काटेरी वाट’ ठरणार असल्याचे चित्र समोर येत आहे.