Municipal Corporation
sakal
धुळे: शहरातील महापालिका मालकीच्या पाचकंदीलमधील चारही मार्केटचा पुनर्विकास करण्यासाठी संभाव्य ५४ कोटी ११ लाख रुपये खर्चास महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिली. तसेच शहरातील रस्त्यांचे खड्डे बुजविण्यासाठी प्राप्त निविदाही मंजूर करण्यात आली. खड्डे बुजविण्याचे हे काम ४० लाख रुपये खर्चातून होणार आहे.