Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: शहरातील आरटीओ कार्यालय येथील मलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केलेले पाणी पुनर्वापरायोग्य करून ते सोनवद प्रकल्पात सोडण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. यासाठी ‘पीएमसी‘ नियुक्तीस महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली. शासनस्तरावर या प्रकल्पास मंजुरी मिळाल्यावरच ‘पीएमसी’ला यासाठी महापालिकेकडून निश्चित शुल्क अदा केले जाणार आहे.