Dhule Municipal Corporationesakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule News : मनपाला सव्वाशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा टेकू! काही वर्षांत भरती; दर सहा महिन्यांत मुदतवाढ, मानधनवाढीचा प्रश्न
Latest Dhule News : या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांत मुदतवाढ देणे, मागणीनुसार त्यांच्या मानधनात वाढ करण्याची कार्यवाही अधून-मधून सुरू असते. मानधन तत्त्वावरील या कर्मचाऱ्यांचे भविष्यात काय होणार हा प्रश्न मात्र कायम असणार आहे.
Dhule News : एकीकडे शहराचा विस्तार वाढत असताना दुसरीकडे धुळे महापालिकेत मनुष्यबळ मात्र कमी होत आहे. महापालिकेत आजघडीला हजारावर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. दरम्यान, महापालिकेने गेल्या काही वर्षात सुमारे सव्वाशे कर्मचारी मानधन तत्त्वावर नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या टेकूने महापालिकेचा गाडा ढकलला जात आहे.
या कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांत मुदतवाढ देणे, मागणीनुसार त्यांच्या मानधनात वाढ करण्याची कार्यवाही अधून-मधून सुरू असते. मानधन तत्त्वावरील या कर्मचाऱ्यांचे भविष्यात काय होणार हा प्रश्न मात्र कायम असणार आहे. (Dhule Municipality takes 700 contract employees recruitment in some years)

