environment
sakal
धुळे: धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील हिरवळ दिवसेंदिवस आटत चालली आहे. काही वर्षांत वनक्षेत्र झपाट्याने घटल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याचे चिन्ह आहे. अवैध वृक्षतोड, अतिक्रमण, गांजाची लागवड, वारंवार वनाग्निचे प्रकार आणि हवामानातील अनपेक्षित बदलासह अस्थिरता आदी अनेक घटकांनी या स्थितीला जबाबदार ठरवले आहे. वनसंपदेचे रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. जंगल टिकले तरच हरित भविष्य सुरक्षित राहील, असे वन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.