Devendra Fadnavis
sakal
धुळे: रोजगारक्षम ‘डिफेन्स कॉरिडॉर’अंतर्गत नाशिक- धुळे ‘रक्षा कॉरिडॉर’ साकारण्याचा प्रयत्न आहे. यात शेतीबरोबर उत्तर महाराष्ट्राला औद्योगिक विकासाचे महत्त्व प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नंदुरबार जिल्ह्यात १५ ते २० हजार कोटींची गुंतवणूक येऊ घातली असून, त्यात धुळेही मागे नाही. राज्य सरकार ताकदीनिशी पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.