धुळे : फुलशेती, शेततळ्यांसह संरक्षित शेतीसाठी निधी

दगाजी देवरे
शनिवार, 29 जुलै 2017

फलोत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र भेटी,राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रयोग,तसेच राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केद्रांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे घेतले जात आहेत.

धुळे (म्हसदी) : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत फुलशेतीसाठी 35.90लाख रुपयांचा निधी आवंटीत करण्यात आला आहे.तसेच सात सामुहिक शेततळ्यांकरीता 36.10लाख,संरक्षित शेतीसाठी 145.00लाख रुपयांचा निधी आवटंन करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी  दिली.

आज एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हा अधिकारी डॉ.दिलीप पाढरपट्टे याच्या अध्यक्षेतेखाली सातपुडा सभागृहात आज झाली.2017-18पासून जिल्ह्यातील फलोत्पादन व भाजीपाला उत्पादक शेतक-यासांठी प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान उपलब्ध आहे.फळे व भाजीपाला क्षेत्रात मधुमक्षिका पालनाचे महत्त्व जाणून चालू वर्षी मधुमक्षिका पालनाकरीता प्रत्येक तालुक्यात किमान दोन मधुमक्षिका पालन वसाहत निर्माती करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.जिल्ह्यातील फलोत्पादन शेतक-यांना संरक्षित शेतीच्या प्रशिक्षणासाठी मनुष्य बळ विकास कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी सहा लाख खर्चून 120 शेतकर-यांना प्रशिक्षण दिले जाईल.

फलोत्पादनाच्या तंत्रज्ञानाच्या प्रक्षेत्र भेटी,राज्यातील कृषी विद्यापीठाचे प्रयोग,तसेच राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केद्रांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरे घेतले जात आहेत.

जिल्ह्यातील कांदा पिकाखालील क्षेत्रात होणारी वाढ व कांदा चाळीची वाढती मागणी लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमातून 38 लाख रुपये निधी कांदा चाळी उभारणीसाठी निश्चित करण्यात आला आहे.सहाशे कांदा चाळींसाठी वाढीव निधीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत जिल्हास्तरीय अभियान समितीच्या मार्फत मागणी करण्यात आली आहे.फलोत्पादन क्षेत्रावर यांत्रिकरण करण्यासाठी शेतक-यांना प्रोत्साहित करण्यासाठी वीस एचपी पर्यंतच्या लहान टॅक्टर,टॅक्टरचलीत अवजारे,फवारणी यंत्रासाठी35.45लाख निधी चारही तालुक्यात विभागून दिला आहे.24-20एचपी पर्यंतचे टॅक्टर व टॅक्टरचलीत अवजारेसांठी जिल्हास्तरीय अभियान समितीने मान्यता दिली आहे.शेडनेटगृह,प्लास्टिक आच्छादन व हरीतगृहासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत180 लाख रुपये निधी अवांटीत करण्यात आला असून यात जिल्ह्यात 75शेडनेटगृह उभारले जातील.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या योजंनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिकारी डॉ.पांढरपट्टे यांनी यावेळी शेतक-यांना केले.यावेळी अग्रणी बॅकेचे पी.पी.गिळाणकर उपस्थित होते.

Web Title: Dhule news agriculture fund

टॅग्स