जैताणेत ग्रामपंचायत व शाळांतर्फे स्वच्छता मोहीम...

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जारी केलेल्या पत्रानुसार धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आदेशान्वये माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत व शाळांतर्फे स्वच्छता पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त नुकतीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

त्यात जैताणेचे सरपंच संजय खैरनार, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, केंद्रप्रमुख शोभा देसले, मुख्याध्यापक अशोक जाधव, सावता बोरसे, शिक्षक विशाल चौरे, श्रीमती देवरे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, भिका न्याहळदे, युवराज बोरसे, आबा भिल, यादव भदाणे आदींसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच जैताणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिक्षक सहभागी झाले होते. जैताणे ग्रामपंचायत चौक व परिसरात श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरम्यान आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातर्फेही शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Web Title: dhule news Cleanliness in Jaitane gram panchayat and schools