धुळे कारागृह फुल्ल झाल्याने आरोपी नाशिक, औरंगाबादला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

धुळे - येथील कारागृह फुल्ल झाल्यामुळे गुंड गुड्डया खूनप्रकरणातील काही आरोपींना ठेवण्यास कारागृह प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे त्यांना नाशिक व औरंगाबाद येथे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान प्रकरणातील मुख्य दोन आरोपी श्‍याम गोयर व विजय गोयर अद्यापही फरार आहेत. 

गुंड गुड्डया हत्याकांड प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींमधील भद्रा ऊर्फ राजेंद्र रमेश देवरे, अभय ऊर्फ दादू रमेश देवरे, भीमा रमेश देवरे, गणेश बिवाल, योगेश बापू जगताप, विकी ऊर्फ विक्रम रमेश चावरे, पारस घारू हे न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र धुळे कारागृह फुल्ल झाल्यामुळे कारागृह प्रशासनाने काही आरोपींना ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना नाशिक व औरंगाबाद कारागृहात पाठविण्यात आला आहे. धुळ्यातील आरोपींना बाहेरील कारागृहात पाठविणे खर्चिक बाब असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

Web Title: dhule news criminal