अहंकार हे नरकाचे दार :  एलाचार्य नवीनसागरजी महाराज

एल. बी. चौधरी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

सोनगीर (जिल्हा धुळे) : अहंकार हे नरकाचे दार असून, जो पर्यंत अहंकार चिकटला आहे तो पर्यंत परमात्माशी दुरावा राहील म्हणून  प्रत्येकाने त्याचा त्याग केला पाहिजे. असे विचार युवा सम्राट एलाचार्य श्री. 108 नवीनसागरजी मुनिराज यांनी मांडले. येथील दिगंबर जैन धर्मियांचे भगवान पुष्पदंत जीन मंदिरात त्यांचा चातुर्मास उपवास येत्या सुरू आहे. त्यानिमित्त सुुरू असलेल्या प्रवचनमालेत ते बोलत होते. महाराजांचा हा दहावा एलाचार्य पदारोहण समारंभ आहे. आणि 16 वा चातुर्मास उपवास आहे. 

प्रवचनमालेत काम, क्रोध, लालच, अहंकार आदी दुर्गुणामुळे भोगावे लागणार्‍या दु:खाबाबत उदाहरणांसह महाराजांनी स्पष्ट केले. ते म्हणाले कोणत्याही विनाशाला माणसाचा अहंकार कारणीभूत असतो. अहंकारी व्यक्तीला चटकन क्रोध येतो. आणि रागात तो व्यक्ती दृष्ट, आंधळा, क्रूर बनतो. कधी कधी तो स्वतःचाही नाश करुन घेतो. इतिहास साक्षी आहे की जगात अहंकारी व्यक्तीचे कधीही कल्याण झालेले नाही. त्याचे कर्म त्याला नरकातच घेऊन जाते. उदाहरणादाखल त्यांनी महाभारतातील एका घटना सांगितली.

ते म्हणाले, "द्रौपदीला तिचा वीर पती अर्जुनावर गर्व होता. त्यामुळे तिने दुर्योधनाचा देखील अपमान केला. परंतु चीरहरण प्रसंगी तिचे पाच वीर पती तसेच द्रोणाचार्य, कृपाचार्य व धृतराष्ट्र देखील मदत करू शकले नाही. त्यामुळे तिचे गर्वहरण होऊन तिने परमेश्वराची आराधना केली. परमेश्वर तिच्या मदतीला धावून आले. ज्याचे कोणी नसतो त्याचा मदतीला परमेश्वर धावून येतो. पण त्यासाठी अहंकाराचा त्याग केला गेला पाहिजे. रावणाचा त्याचा अहंकार व गर्वामुळे नाश झाला. आपण तर सर्वसाधारण व्यक्ती आहोत. म्हणून अहंकाराचा आजच नव्हे आताच त्याग करा," असे आवाहन महाराजांनी केले. यावेळी जैन बंधू भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Web Title: dhule news elacharya navin sagar ji maharaj