नियमित वीजबिल भरूनही ग्राहकांना शाॅक

दगाजी देवरे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

दोन हजारांच्यावर वीज ग्राहक हैराण
म्हसदी उपकेद्रांत म्हसदीसह ककाणी,राजबाईशेवाळी, भडगाव, वसमार, धमनार, काळगाव आदी गावांचा समावेश आहे.यात 2017 घरगुती वीज ग्राहक आहेत.तथापि दर महिन्याला नियमितपणे बिल भरणा-या ग्राहकांना दोन महिन्यापासून भरलेले बिल देवून शाॅक दिला जात आहे.वाढीव बिल पाहून अनेक ग्राहकांनी धस्का घेतला आहे.बुचकळ्यात पडलेल्या ग्राहक वीज कार्यालयाकडे धाव घेत आहेत.

धुळे (म्हसदी)  : वीज वितरण कंपनीचा भोगंळ कारभार सर्वश्रुत आहे.वेळेवर बिल न येणे, बिल वाढीव येणे असे प्रकार नेहमी घडतात.गेल्या दोन महिन्यापासून ऑनलाइनमुळे देयके भरूनही नव्या देयकात बिल वाढवून येत असल्याने ग्राहक वैतागला आहे.भरलेले बिल कमी करण्यासाठी ग्राहकांना वायरमनचा शोध घ्यावा लागत आहे.प्रसंगी सबंधीत कर्मचा-यांची विनवणी करावी लागत आहे.

ऑनलाइन डोकेदुःखीच
गैर प्रकारास आळा बसावा म्हणून शासनाने ऑनलाइन प्रणाली अंमलात आणली आहे.वीज वितरण कंपनी घरगुती वीज वापर करणा-या ग्राहकांना दर महिन्याला देयके देते.गेल्या दोन महिन्यापासून नियमितपणे बिल भरून नवीन आलेल्या बिलात मागचे बिल लावून येत आहे.यामुळे बिल भरणा-या ग्राहकांना शाॅक बसत आहे.बॅकेंत बिल भरण्यासाठी भरलेले बिलावरुन बिल कमी करावे लागत आहे.यासाठी सबंधीत वायरमनचा शोध घ्यावा लागत आहे किंवा गांवालगत असलेल्या वीज उपकेद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे.वसमार रस्त्यावर असलेल्या वीज उपकेद्रांत आज सकाळपासून वीज ग्राहकांनी धाव घेतली.

दोन हजारांच्यावर वीज ग्राहक हैराण
म्हसदी उपकेद्रांत म्हसदीसह ककाणी,राजबाईशेवाळी, भडगाव, वसमार, धमनार, काळगाव आदी गावांचा समावेश आहे.यात 2017 घरगुती वीज ग्राहक आहेत.तथापि दर महिन्याला नियमितपणे बिल भरणा-या ग्राहकांना दोन महिन्यापासून भरलेले बिल देवून शाॅक दिला जात आहे.वाढीव बिल पाहून अनेक ग्राहकांनी धस्का घेतला आहे.बुचकळ्यात पडलेल्या ग्राहक वीज कार्यालयाकडे धाव घेत आहेत. वीज बिल भरूनही ग्राहकांना कमी करण्यासाठी विनवणी करावी लागत आहे.ग्राहकांना भरलेले बिल आहे का..?मागचे बिल आणा असे फर्मान वायरमन सोडत आहेत. आणि बिल हरवले असेल तर विचारायालाच नको..?

नियमित बिल भरणा-यांचीच अडवणूक
वीज वितरण कंपनी नियमित बिल भरणा-यांचीच अडवणूक करत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी "सकाळ"जवळ व्यक्त केली.दुसरीकडे घरात लाईट,पंखा यासारखे प्रत्येकी एक उपक्रण असताना चार आकडी बिल ग्राहकांना देण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आला आहे.दोन महिन्यांपासून भरलेले बिल नवीन देयकात का आले? याविषयी पिंपळनेर विभागाचे उप अभियंता किशोर पाटील याच्यांशी संपर्क साधला असता ऑनलाइनमुळे हे झाल्याचे ते म्हणाले.यापूर्वी धुळे येथे सबंधीत विभाग देयकाचे काम पाहत होते.आता सबंधीत फाईल मुंबई जात असल्याने ही गडबड झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.वीज कंपनीच्या अनेक विभागाच्या भोगंळ कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.या पुढील देयकात असे घोळ होणार नाहीत असेही श्री.पाटील म्हणाले.

Web Title: Dhule news electricity bill

टॅग्स