गोकुळमाता देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची ग्रामस्थांची मागणी

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): येथून जवळच साक्री-नंदुरबार रस्त्यालगत भामेर (ता. साक्री) शिवारातील गोकुळमाता देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी येथील सेवेकरी बापू हरी जाधव, आनंदा रोकडे, सुदाम खलाणे, जितेंद्र जयस्वाल, अभिमन भदाणे, पांडू भदाणे, मोहन सुर्यवंशी, बापू सोनवणे, युवराज खलाणे आदींनी केली आहे. निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या या देवस्थानाकडे शासनाने लक्ष घातल्यास पर्यटन उद्योगासही चालना मिळू शकते, असेही संबंधितांचे म्हणणे आहे.

गोकुळमाता देवस्थान हे माळमाथा परिसरातील सर्वात प्राचीन देवस्थान आहे. शेकडो वर्षाचा इतिहास या देवस्थानाला असताना केवळ अनास्थेमुळे त्याचा विकास खुंटला आहे. काही किलोमीटर अंतरावरील इतिहासकालीन भामेरच्या किल्ल्यावरील मोती टाक्याचे पाणी थेट येथील गोमुखातून बाहेर पडते. पूर्वी मोती टाक्यात जर लिंबू आणि अंडे टाकले तर ते थेट येथील गोमुखातून बाहेर पडायचे अशी अख्यायिका आहे. कितीही कडक उन्हाळा असला तरी याठिकाणी २४ तास पाणी उपलब्ध असते. पाण्याचा सुंदर झरा येथे आहे. भाविकांसाठी शेड उभारण्यात आलेले असून, याठिकाणी सुमारे 1000 ते 1500 एवढी सिताफळाची झाडे आहेत.

नवरात्रोत्सवात येथे दरवर्षी घटस्थापना केली जाते. मंगळवारी व शुक्रवारी याठिकाणी मानता, जाऊळ, लग्नकार्य आदी कार्यक्रम होतात. मांसाहार येथे वर्ज्य असून दाळ-बट्टी प्रसाद म्हणून केला जातो. शेकडो वर्षापूर्वीची गोकुळमातेची दगडाची स्वयंभू मूर्ती असून खानदेशासह मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांमधून भाविक दर्शनासाठी येतात. निजामपूर, जैताणेसह भामेर परिसरातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. सद्या बापू हरी जाधव व त्यांचे सहकारी या परिसराची पूर्णवेळ देखभाल करतात. त्यामुळे याठिकाणी नंदनवन फुलले आहे.

Web Title: dhule news gokulmata devasthan demand pilgrimage status